नांदेड जिल्हा परिषदेचा २७ कोटी ४४ लाख रुपयांचा अर्थसंकल्प सादर

File photo
File photo

नांदेड ः जिल्हा परिषदेच्या विशेष  अर्थसंकल्पीय सभेत बुधवारी (१७ मार्च २०२१) जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा तथा अर्थ सभापती पदमा रेड्डी सतपलवार यानी २७ कोटी ४४ लाख रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला. सदर अर्थसंकल्पामध्ये वैयक्तीक लाभाच्या योजनेत जिल्ह्याच्या ग्रामिण भागातील महिलांसाठी ३० टक्के वाटा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. 

नांदेड जिल्हा परिषदेची ऑनलाईन अर्थसंकल्पीय सभेचे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झाली. या सभेत  जिल्हा परिषदेच्या अर्थ सभापती तथा उपाध्यक्ष पदमा रेड्डी सतपलवार यांनी जिल्ह्याच्या ग्रामिण भागातील नागरीकांना डोळ्यासमोर ठेवत २७ कोटी ४४ लाख रुपयांचा सर्वांकष अर्थसंकल्प सादर केला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर, सभापती संजय बेळगे, अ‍ॅड रामराव नाईक, सुशिलाताई बेटमोगरेकर, मुख्य लेखा व वित्त अधिकारी रावसाहेब कोलगाने, अति लेखा व वित्त अधिकारी शेखर कुलकर्णी उपस्थित होते. 

दुसऱ्यांदा अर्थसंकल्प सादर करण्याचा मान मिळालेल्या जिल्हा परिषदेच्या अर्थसभापती सौ. सतपलवार यांनी सर्वच विभागांना न्याय देण्याचा प्रयत्न केला.  यामुळे सभागृहात महाविकास आघाडीच्या नेत्यांसह जिल्हा परिषदेतील विरोधी पक्ष भाजपनेही सभापती सौ. सतपलवार यांचे कौतूक केले. सभेच्या सूरूवातीला आवाज येत नसल्याने काही काळ गोंधळ निर्माण झाला होता.  जिल्हा परिषदेच्या आयटी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने त्यात दुरूस्ती केल्याने गोंधळ शांत झाला. 

अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना द्यावयाच्या कडबा कटरच्या निधीमध्ये वाढ केला नसल्याचा मुद्दा सदस्य साहेबराव धनगे यांनी उपस्थित केला. याशिवाय जिल्हा परिषदेच्या उत्पन्न वाढीचा मुद्दा सदस्य माणिक लोहगावे, विजय बास्टेवाड यांच्यासह अनेक सदस्यांनी उपस्थित केला. कोरोना कहरामुळे खर्च न झालेला माळेगाव यात्रेचा निधी इतर विभागाला वळवल्याचा आरोप सदस्य चंद्रसेन पाटील यांनी उपस्थित केला. यावर उपाध्यक्षा यांनी त्यातील नऊ लक्ष रुपयाचा निधी माळेगाव यात्रेसाठी दिला असल्याचे सभागृहात स्पष्ट केले.

कै.डॉ.शंकरराव चव्हाण यांच्या नियोजित पुतळ्यासाठी २० लक्ष तसेच कृषी विभागाच्या योजना शेतकऱ्यांना मिळाव्यात यासाठी ट्रॅक्टर चलीत रोटावेटर, हळद काढणी यंत्रासाठी, उस लागवड ट्रॅक्टर यंत्रासाठी लाभार्थांना प्रत्येकी ५० हजार अनूदान, पशुसंवर्धन विभागासाठी गाव तेथे खोडा बसवण्यासाठी १२ लाख रुपये, गोशाळांना अनुदानासाठी पाच लाख रुपयाची, पंचायत समिती स्तरावर अद्यावत कक्ष यासाठी दोन लाख ४० हजार, जिल्हा परिषद सदस्य, पदाधिकारी यांच्या अभ्यास दौरा, समाज कल्याण विभागासाठी मागासवर्गीय विद्यार्थांना स्पर्धा परिक्षा प्रोत्साहनपर अनुदान, उदरनिर्वाहासाठी फिरते स्टॉल घेण्यासाठी १० लाख रुपयाचा निधी यासह अन्य बाबींसाठी सन २०२१-२२ च्या अर्थसंकल्पात तरतुद केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com