नांदेड : जिल्हा परिषद शाळांतील पटसंख्या वाढविणे सोपे नाही

शिक्षणतज्ज्ञ हेरंब कुलकर्णी : मुख्याध्यापक बशीर पठाण यांचे केले कौतुक
Nanded Zilla Parishad school students number less as English school
Nanded Zilla Parishad school students number less as English schoolsakal

नांदेड : इंग्रजी शाळांच्या गर्दीमध्ये जिल्हा परिषद शाळांचे अस्तित्व टिकविण्यासाठी बहुतांश शिक्षक प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत. त्यापैकीच एक असलेली शाळा फत्तेपूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा होय. महाराष्ट्रातील प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ हेरंब कुलकर्णी हे नुकतेच नांदेड दौऱ्यावर आले असता त्यांनी शाळेचे मुख्याध्यापक बशीर पठाण यांचे कौतुक केले.

श्री. कुलकर्णी म्हणाले की, अगोदरच जिल्हा परिषद शाळेकडे बघण्याचा दृष्टीकोन पालकांचा बदललेला आहे. अशा परिस्थितीमध्ये फत्तेपूर जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक बशीर पठाण यांनी नावीन्य आणि गुणवत्तापूर्ण उपक्रम राबवून चाळीस पटसंख्येवरून दोन वर्षात सव्वाशे विद्यार्थी संख्या केली आहे, ही साधी गोष्ट नाही. शिक्षण विस्तार अधिकारी व्यंकटेश चौधरी यांनी तुमची शिफारस करणे हीच गोष्ट माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे. पुढच्या वेळी तुमच्या शाळेला नक्की भेट देईन, असे आश्वासन त्यांनी दिले.

या दौऱ्यात त्यांनी कोरोना काळात विधवा झालेल्या महिलांसाठी रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेतलेल्या स्वयंसेवी कार्यकर्त्यांच्या बैठकीत मार्गदर्शन केले. या बैठकीस उपमुख्य कार्यकारी अधिकारी रेखा काळम पाटील, डॉ. पी. डी. जोशी, अनुजा डोईफोडे, शिक्षण विस्तार अधिकारी व्यंकटेश चौधरी, सहायक कार्यक्रम अधिकारी डॉ. विलास ढवळे, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक शिवा कांबळे, शिवाजी आंबुलगेकर, डॉ हेमंत कार्ले, बसवंते आदींसह शैक्षणिक चळवळीत काम करणारे अधिकारी आणि शिक्षक उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com