नांदेड : जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना सापडला मुहूर्त

२० ते २६ मे दरम्यान होणार जिल्ह्यातील सार्वत्रिक बदल्या
Nanded Zilla Parishad staff transfers between 20th to 26th May
Nanded Zilla Parishad staff transfers between 20th to 26th Maysakal

नांदेड : जिल्हा परिषदेच्या सार्वत्रिक बदल्या होणार किंवा नाही या संभ्रमात असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी जिल्हा परिषद प्रशासनाला मुहूर्त सापडला असून येत्या ता.२० ते ता.२६ मे दरम्यान जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवर कार्यरत असणाऱ्या बदलीपात्र कर्मचाऱ्यांच्या समुपदेशन पध्दतीने बदल्या करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे सामान्य प्रशासनाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सुधिर ठोंबरे यांनी दिली आहे.

नांदेड जिल्हा परिषदेच्या समुपदेशन पध्दतीने होणाऱ्या सार्वत्रिक बदल्या प्रत्येक वर्षी या ना त्या कारणास्तव चर्चेतच असतात. गतवर्षी झालेल्या समुपदेशन बदली प्रकरणाच्या तक्रारीने औरंगाबादचे विभागीय आयुक्त कार्यालय आवाक् झाले होते. गतवर्षीच्या बदली प्रक्रियेत इंग्रजी माध्यमाच्या शिक्षकास गणित विषयासाठी नेमल्याने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठाने चांगलेच सुनावले असल्याची बाब ताजी असतानाच जिल्हा परिषदेत सार्वत्रिक बदल्यांची प्रक्रिया पुर्ण होईल का, या बाबत कर्मचारी संभ्रमात होते.

जिल्हा परिषद प्रशासनाने मंगळवारी काढलेल्या आदेशाने कर्मचाऱ्यांतील संभ्रम दुर झाला असून येत्या ता.२० ते ता.२६ मे दरम्यान जिल्हा परिषदेतील समुपदेशन बदली प्रक्रियेला सुरवात करण्यात येणार आहे. ही बदली प्रक्रिया जिल्हा परिषदेतील यशवंतराव चव्हाण सभागृहात घेण्यात येणार आहे.

समुपदेशन बदली प्रक्रियेच्या पहिल्या दिवशी ता.२० मे रोजी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांच्या समक्ष सकाळी १० ते १२ वेळेत बांधकाम विभाग, दुपारी १२ ते एक लघुपाटबंधारे विभाग, दुपारी एक ते तीन या वेळेत ग्रामीण पाणीपुरवठा विभाग व त्यानंतर बदली प्रक्रिया संपेपर्यंत महिला बालकल्याण विभागाच्या सार्वत्रिक बदली प्रक्रिया चालणार आहे. बदली प्रक्रियेच्या दुसऱ्या दिवशी २१ मे रोजी कृषि विभाग, सामान्य प्रशासन विभागांची बदली प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. २३ मे रोजी आरोग्य विभागातील बदली पात्र कर्मचाऱ्यांसाठीची बदली प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. २४ मे रोजी शिक्षण विभागातील शिक्षकांच्या बदल्या वगळता अन्य पदांसाठीच्या बदल्या करण्यात येणार आहेत.

२५ मे रोजी ग्रामपंचायत विभागातील कर्मचाऱ्यांसाठी बदली प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. बदली प्रक्रियेच्या शेवटच्या दिवशी पशुसंवर्धन विभाग, वित्त विभागातील बदलीपात्र कर्मचाऱ्यांची समुपदेशन पध्दतीने बदली प्रक्रिया पार पडणार आहे. बदलीपात्र कर्मचाऱ्यांनी ठरवून दिलेल्या दिवशीच जिल्हा परिषदेत यावे असे आवाहन करण्यात आले आहे.

जिल्हा परिषदेच्या समुपदेशन प्रक्रियेदरम्यान कर्मचारी राजकीय वजन वापरून बदली करण्यासाठी दबाव आणल्यास अशा कर्मचाऱ्यांविरूध्द प्रशासकीय कारवाई करण्यात येणार असून कर्मचाऱ्यांनी बदली प्रक्रिया सर्व विभाग प्रमुखांनी पारदर्शी पार पाडावी.

- वर्षा ठाकूर-घुगे, मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक, जिल्हा परिषद नांदेड.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com