Nanded Zilla Parishad: नांदेड झेडपीने मंजूर केला २३.२६ कोटींचा अर्थसंकल्प; ग्रामीण विकासाला गती

Nanded ZP Budget 2026-27: नांदेड जिल्हा परिषदेने वर्ष २०२६-२७ च्या अर्थसंकल्पास मंजुरी दिली. २३.२६ कोटी रुपयांच्या या अंदाजपत्रकात महिला सक्षमीकरण, आधुनिक शेती, दर्जेदार शिक्षण, सक्षम आरोग्य आणि पाणीपुरवठा यांसारख्या ग्रामीण विकासाच्या योजना प्राधान्याने आहेत.
Nanded Zilla Parishad

Nanded Zilla Parishad

esakal

Updated on

नांदेड: जिल्हा परिषदेचा वर्ष २०२६-२७ या वर्षाचा मूळ तसेच वर्ष २०२५-२६ चा सुधारित असा एकूण २३ कोटी २६ लाख रुपयांच्या अंदाजपत्रकास मंगळवारी (ता.१७) मंजुरी देण्यात आली. जिल्हा परिषदेच्या स्वतःच्या उत्पन्नातून तयार करण्यात आलेल्या या अंदाजपत्रकास मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मेघना कावली यांनी मान्यता दिली. यशवंतराव चव्हाण सभागृहात झालेल्या बैठकीत विविध विभागांच्या योजनांवर चर्चा करून अंदाजपत्रकाला अंतिम स्वरूप देण्यात आले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com