‘त्या’ बेपत्ता पॉझिटिव्ह रुग्णांमुळे नांदेडकरांचा जीव टांगणीला

प्रल्हाद कांबळे
Wednesday, 13 May 2020

आठवडा लोटला, पोलिसांकडून शोध सुरू. कोरोना रुग्ण वाढत असल्याने प्रशासनासह नांदेडक चिंतेत सापडले आहे. मात्र त्यांच्या मुसक्या आवळू असा विश्‍वास पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी व्यक्त केला आहे. 

नांदेड : मागील आठवड्यापासून ते दोन पॉझिटीव्ह रुग्ण बेपत्ता आहेत. त्यांचा पोलिसांकडून कसुन शोधघेतल्या जात आहे. मात्र अद्याप सापडले नसल्याने नांदेडकरांसह प्रशासनाचाही जीव टांगणीला लागला आहे. 

पोलीस प्रशासनाकडून या दोघांचा शोध सुरू असून लवकरच ते पोलिसांच्या जाळ्यात पडतील असा विश्वास पोलिसांकडून व्यक्त होत आहे. शहरात सापडलेला पहिला बाधित रुग्ण दगावला. त्यानंतर अबचलनगरचा वाहन चालक हा दुसरा कोरोना बाधित आढळू आला. त्याचा उपचारानंतर बरा झाल्याने मंगळवारी (ता. १२) रात्री त्याला घरी पाठविण्यात आले. हा रुग्ण पंजाब राज्यात काही भाविकाला सोडून घरी परत आला होता. त्यानंतर त्याला कोरोनाची लागन झाल्याचे तपासणीत निष्पन्न झाले होते. त्याच्या संपर्कात आलेल्या काही जणांना कोरोनाची लागन झाली होती. व त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. 

हेही वाचादिलासादायक : नांदेडवरुन विशेष रेल्वेने दीड हजार परप्रांतीय मजूर उत्तरप्रदेशकडे आज जाणार

त्यांचा पूर्ण पत्ता नसल्याने शोध घेणे पोलिसांना अवघड

नांदेड येथून पंजाबमध्ये गेलेल्या भाविकांना कोरोनाची लागन झाल्याचे उघडकीस आल्यानंतर प्रशसानाने येथील काही नागरिकांची तपासणी केली. लंगरसाहिब परिसरातील काही नागरिकांची पहिल्या टप्प्यात घेण्यात आलेल्या ९७ तपासणी अहवालामध्ये २० रुग्ण कोरोना बाधीत आढळले. त्यातील १६ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर दोघांना शोधून काढले. दरम्यानच्या काळात या चार बेपत्ता रुग्णावर वजिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या चारही जणांच्या नावांमध्ये संभ्रम असल्याने व त्यांचा पूर्ण पत्ता नसल्याने त्यांचा शोध घेणे पोलिसांना अवघड जात आहे.

चंद्रपूरहून आणलेल्या तिन्ही युवकांची सटका

एवढेच नाही तर चंद्रपूर पोलिसांनी तिन संशयीतांना ताब्यात घेवून नांदेड पोलिसांच्या स्वाधीन केले होते. पोलिसांनी चंद्रपूरहून आणलेल्या तिन्ही युवकांची तापसणी केली असता ते नांदेड येथील नसल्याचे समजले. मात्र त्यांनाही सात दिवस क्वारंटाईन करून रात्री सोडून देण्यात आले आहे. परंतु कोरोना बाधीत दोन रुग्ण सापडत नसल्याने पोलिस विभागाकडून त्यांचा शोध सुरू आहे. ते नांदेड शहरातच कुठे तरी दबा धरुन बसले असतील असा अंदाज पोलिसांकडून व्यक्त केल्या जात आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nandedkar's life was hanged due to those missing positive patients nanded news