घाटावरील निराधारांना नांदेडभूषण बलविंदरसिंघजींनी दिली ‘मायेची ऊब’

प्रल्हाद कांबळे
Saturday, 5 December 2020

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रथम उपप्रांतपाल दिलीप मोदी होते. भाजपा जिल्हाध्यक्ष प्रवीण साले, गॅट एरिया लीडर जयेश ठक्कर, झोन चेअरमन योगेश जैस्वाल, विजय भारतीया, जीएसटी कॉर्डिनेटर गौरव भारतीया, नांदेड लॉयन्सचे अध्यक्ष दीपक रंगगानी, लॉयन्स सफायरचे रविंद्र औंढेकर, सेंट्रलचे सेक्रेटरी ॲड. उमेश मेगदे, भाजयुमो माजी अध्यक्ष दिलीपसिंघ सोडी, भाजप उपाध्यक्ष परमवीरसिंघ मल्होत्रा यांच्या हस्ते थंडीत कुडकुडत झोपलेल्या निराधारांना ब्लॅंकेट पांघरण्यात आले.

नांदेड : कडाक्‍याची थंडी रस्त्याच्या कडेला कुडकुडत्या थंडित झोपलेल्या निराधारांना नांदेड भूषण संत बाबा बलविंदरसिंघजी यांच्या हस्ते ‘मायेची ऊब’ उपक्रमांतर्गत बुधवारी (ता. दोन) मध्यरात्री सहा तासात तब्बल सहाशे ब्लँकेटचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रथम उपप्रांतपाल दिलीप मोदी होते. भाजपा जिल्हाध्यक्ष प्रवीण साले, गॅट एरिया लीडर जयेश ठक्कर, झोन चेअरमन योगेश जैस्वाल, विजय भारतीया, जीएसटी कॉर्डिनेटर गौरव भारतीया, नांदेड लॉयन्सचे अध्यक्ष दीपक रंगगानी, लॉयन्स सफायरचे रविंद्र औंढेकर, सेंट्रलचे सेक्रेटरी ॲड. उमेश मेगदे, भाजयुमो माजी अध्यक्ष दिलीपसिंघ सोडी, भाजप उपाध्यक्ष परमवीरसिंघ मल्होत्रा यांच्या हस्ते थंडीत कुडकुडत झोपलेल्या निराधारांना ब्लॅंकेट पांघरण्यात आले.

हेही वाचा -  जिंतूर : खाजगी शिकवणीवर्ग चालकांकडून विद्यार्थ्यांच्या जीविताशी खेळ : परवानगी नसतांनाही बिनधास्तपणे वर्ग झाले सुरू

लॉयन्स सेंट्रलचे अध्यक्ष संजय अग्रवाल यांनी गोविंद उत्तरवार, रितेश तेहरा यांच्यासह सर्व ब्लॅंकेट दात्यांचा सिरोपाव आणि मोत्याची माळ टाकून सन्मान केला. बाबाजींच्या हस्ते सर्व माध्यम प्रतिनिधींचा सत्कार करण्यात आला. दिलीप ठाकूर यांनी प्रास्ताविक केले. प्रवीण साले यांनी दिलीप ठाकूर यांच्या कल्पकतेचे कौतुक केले. दिलीप मोदी, जयेश ठक्कर, सीए गौरव भारतीया यांनी उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. रात्री साडेनऊ वाजता नगीना घाट येथून सुरुवात करून जुना मोंढा, शनी मंदिर, गणपती मंदिर, बंदा घाट, हनुमान पेठ, गांधी पुतळा, शिवाजी पुतळा, कोर्ट परिसर तसेच रेल्वे स्टेशनवर उघड्यावर झोपलेल्या निराधारांना ब्लँकेट वाटपाचा कार्यक्रम सकाळी साडेतीन वाजेपर्यंत चालला. शहरातील राजेशसिंह ठाकूर, कैलास महाराज वैष्णव, राहुल तेलंग, दिगंबर रुमणे, आवेस बेग, संतोष भारती यांनी परिश्रम घेतले. नूतन वर्ष २०२१ असल्यामुळे संकल्पपूर्तीसाठी आणखी ८०० बँकेची आवश्यकता असल्यामुळे नागरिकांनी भरभरून प्रतिसाद द्यावा असे आवाहन
लॉयन्स क्लब नांदेड सेंट्रल तर्फे करण्यात आले आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded's Bhushan Balwinder Singhji gives 'boredom of love' to the destitute on the Ghats nanded news