नांदेडच्या ‘या’ आमदारांचा असाही विरंगुळा

फोटो
फोटो

नांदेड : कुठलाही राजकारणी किंवा लोकप्रतिनिधी असो की आमदार, खासदार मंत्री. ते नेहमी कडक पांढरेशुभ्र वस्त्र परिधान केलेले आणि आपल्या एलीशान चारचाकी वाहनातून निवडून आल्यानंतर गाडीतून नागरिकांना हात दाखविणारा नेते. मात्र नांदेड (उत्तर) चे आमदार बालाजी कल्याणकर यांनी चक्क आपल्या ग्रामिण दौऱ्यात लहान मुलांच्या गोट्या खेळात रमले. त्यांनी चक्क आपल्या हातात गोटी घेऊन बालपणीच्या आठवणीला उजाळा दिला. हा प्रकार पाहून उपस्थितांना आश्‍चर्य वाटले. 

आमदार झाल्यास रुबाब पाहून सामान्य माणसांसह अधिकारी व कर्मचारी चार हात दूर राहतात. परंतु या सगळ्या मोठेपण व अभासीपणाला नांदेड उत्तरचे शिवसेनेचे आमदार बालाजी कल्याणकर हे अपवाद ठरले. आपल्या मतदारसंघातील सुगाव या गावात गेल्यावर त्यांनी तरुणांसोबत गोट्या खेळण्याचा आनंद लुटत बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला.

कुठल्याच आमंत्रणाची वाट न पहाणारा आमदार

आमदार बालाजी कल्याणकर हे काम करण्याची प्रामाणिपणे धडपड, लोकांमध्ये जाऊन मिसळणे, कुणाचा लहान असो, की मोठा गरिबांचा असो की श्रीमंताचा अगदी कुणाचाही कसल्याप्रकारचा कार्यक्रम असो आणि विशेष म्हणजे आमंत्रण असो अथवा नसो. त्या घरी सकाळी जाऊन बालाजी कल्याणकर भेट घेणार, पाणी नसेल तर टँकर हमखास पोहचणारच. कुणाच्या घराचे बांधकामास साहित्य कमी पडत असले तर उधारीत त्यांच्या दुकानातून खात्रीशीरपणे साहित्य पाठवतात. 

महापालिकेत विरोधीपक्ष नेत्याची सांभाळली जबाबदारी

बालाजी कल्याणकर यांनी कधीही स्वतःचा स्वभाव बदलला नाही. त्यांचा स्वभाव, काम करण्याची धडपड व तत्परतेने त्यांना थेट मुंबईचे विधानभवन दाखविले. पहाता-पहाता ते नेता बनले. त्यांच्यातील कार्यकर्तापण कधीही संपले नाही. त्यामुळे मागच्या नगरपालिका निवडणुकीत ते शिवसेनेचे एकमेव नगरसेवक म्हणून निवडून आले. यापूर्वी शिवसेनेचे सभागृहात पंधरा नगरसेवक होते.

सर्वसामान्यांच्या अडचणीत धावणारे

सामान्य कार्यकर्त्यांना नेता बनविण्याचे काम शिवसेनेने केले, तसेच काम आमदार बालाजी कल्याणकर यांच्या बाबतीत आहे. काँग्रेसच्या गडात दोन वेळा आमदार व राज्यमंत्री राहिलेल्या डी. पी. सावंत यांना पराभूत करून ते आमदार झाले. पण काम करण्याची पद्धती त्यांची कधीही बदलू शकली नाही. सकाळपासून सुरु होणार भेटीगाठी कार्यक्रम रात्रीपर्यंत सुरुच असतो. खेडेपाड्यात जाणे, गावकऱ्यांच्या समस्या ऐकणे, शक्य होईल त्या सोडविणे हा त्यांचा मुळ स्वभाव राहिला आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com