वंचित घटकांच्या शैक्षणिक उत्थानासाठी ' न्याय'  देणारे नांदेडचे सामाजिक भवन' बनले' पथदर्शी  

file photo
file photo

नांदेड : मनुष्य केवळ भाकरीवर जगत नाही. त्याला जिवंत मन आले. त्या मनाला विचाराचे खाद्य पाहिजे असा संदेश भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिला. त्याला मूर्तरूप देण्याचे काम समाज कल्याण विभाग करते. नांदेडच्या सामाजिक न्याय भवन व परिसर आता देखणा. सुंदर.... रमणीय झाला आहे. खडकाळ भागात बाग..फुलली..झाड कामानिमित्त येणाऱ्यांसाठी 'सावली " बनली आहेत ही किमया घडवून आणली ती या सामाजिक न्याय विभागाचे सहाय्यक आयुक्त टी. एल. माळवतकर यांनी.

बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सह डिसेंबर महापरिनिर्वाण दिन...हजारो अनुयायी बाबासाहेबाना अभिवादन करताना काही संकल्प करतात."उद्धरली कोटी.... कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे.....। याचे वास्तव नव्या पिढीलाही आता कळू लागले आहे. त्यामुळे बाबासाहेबांच्या विचारांचे अनुकरण करणारी तरुणाई आता उच्चशिक्षणासाठी सजग झाली आहे. पिढ्यानपिढीच्या दारिद्र्यात खितपत पडलेल्या समाजात शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे तो प्राशनकरारा गुरगुरल्या शिवाय राहणार नाही हा बाबासाहेबांचा विचार आत्मसात झाला आणि अनेक कुळीचा उद्धार झाला. 

हेही वाचा -  सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनास भरभरुन योगदान द्यावे- डॉ. विपीन इटनकर -
 
साठ- सतर- ऐंशीच्या दशकात परिस्थिती अंत्यत गरिबीची. मेलेली जनावरे ओढून टाकणारी आणि  वेशी ओलांडून गावात दररोज दारोदार भाकरीसाठी घरं मागणारी अख्खी पिढी शिक्षणाने सुधारली. अनेकांना नौकरीला लागली. त्याच पिढीचा दुसरा- तिसरा वारसा सुधारला. त्या  काळात  शिक्षणासाठी आधार मिळाला तो समाज कल्याण विभागाच्या शिष्यवृत्तीचा ( आता सामाजिक न्याय असं नामकरण) आणि त्यांनी चालविलेल्या बोर्डिंगीचा. समाजकल्याण कार्यालय म्हटल की त्याकाळात विशिष्ट भावमुद्रा व्हायची..अस्तावेस्त ..कार्यालय ..विशिष्ट समूहाचे ऑफिस अशीच बनलेली धारणा ..पण कालौघात ही भूमिका बदलली ..

नांदेडच्या सामाजिक न्याय भवन राज्यातच आपली आगळीवेगळी ओळख निर्माण करते आहे.  त्यासाठी सहाय्यक आयुक्त टी. एल. माळवतकर यांनी स्वतः पुढाकार घेतला व या सामाजिक भवनाला नवी ओळख दिली. खडकाळ जमीन. जागोजागी गवत..बेशिस्त वाहनांची पार्किंग..एवढी मोठी इमारत ..एवढी अवाढव्य जागा . ना .शिस्त ना.. नियोजन  ..सगळं कसं  'रुक्ष" वाटणार.. पण सहाय्यक आयुक्त श्री माळवतकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे शिकवण अंगिकारली आणि या सामाजिक भवनास  "न्याय " दिला. समोरील दर्शनी भागात एक प्रशस्त गार्डन..वेगवेगळ्या प्रकारची झाडे..विविधरंगी फुलं . टवटवीत..मन प्रफुल्लित .. आकर्षित करणारी जणू काही एखाद्या पर्यटनस्थळी आपण आलो असाची जाणीव व्हावी असे .. दृश्य... राज्यातील असे देखणं सामाजिक न्याय भवन पहिलीच असावे ते " मॉडेल " ठरणारे ...! 

प्रशस्त इमारत ..जात पडताळणी सह अन्य विभाग..मागासवर्गीयांच्या उत्थानासाठी काम करणारे वेगवेगळे कार्यालय...इमारत चकचकीत.. कुठेही कोनाड्यात तंबाकू..गुटका खाऊन पिचकाऱ्या मारलेल्या दिसणार नाहीत. शौचालय ..तसेच व्हरांडा पाहताच क्षणी ..पूर्वीची अवकळा लयास गेल्याचे जाणवते." स्वधार" शिष्यवृत्ती  योजना  आता असंख्ये कुटुंबाचा आधार बनतो आहे एवढं नव्हें तर मुलीच्या लग्नाला "हातभार " लावण्यास मदत होते आहे त्यासाठी श्री माळवतकर  व टीम सजग राहून लाभार्थ्यांना शासकीय योजनेचा फायदा करून देताना दिसले.. जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक जिल्हा मुख्यालय कार्यालयाच्या तोडीस तोड देणारा नव्हे तर पाऊल पडती पुढे असा हा सामाजिक न्याय भावनाचा परिसर  झाला आहे..
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com