नांदेड जिल्ह्यात 12 डिसेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालत 

प्रल्हाद कांबळे
Friday, 4 December 2020

सदर राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये दिवाणी, मोटार अपघात दावा, भूसंपादन, किरकोळ दिवाणी अर्ज, तसेच बॅंकांची प्रकरणे इत्यादी न्यायालयात प्रलंबित असलेली प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात येणार आहेत. त्याचबरोबर प्रलंबित तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे सदर लोकन्यायालयात ठेवण्यात येणार आहेत. 

नांदेड : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या आदेशान्वये जिल्हा विधी सेवा प्राधिकरणतर्फे ता. १२ डिसेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा न्यायालय, नांदेड व जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयात तसेच कौटुंबिक न्यायालय, कामगार न्यायालय व सहकार न्यायालय, नांदेड येथे राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. 

सदर राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये दिवाणी, मोटार अपघात दावा, भूसंपादन, किरकोळ दिवाणी अर्ज, तसेच बॅंकांची प्रकरणे इत्यादी न्यायालयात प्रलंबित असलेली प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात येणार आहेत. त्याचबरोबर प्रलंबित तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे सदर लोकन्यायालयात ठेवण्यात येणार आहेत. 

हेही वाचा -  नांदेड : रक्तपेढ्यांच्या गोरखधंद्यावर अंकुश बसणार, नियम डावलल्यास होणार कारवाई -

याशिवाय, सदर लोक अदालतीत विद्युत कंपनी, विविध बॅंका, भारत संचार निगम यांचे थकीत बाकी येणे बाबतची दाखल पुर्व प्रकरणे तसेच, विविध मोबाईल कंपन्यांचीही थकित रकमेबाबतची प्रकरणे तडजोडीद्वारे निकाली काढण्यासाठी ठेवण्यात येणार आहेत. 

या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये जिल्ह्यातील सर्व सन्माननीय विधीज्ञ आणि विविध विमा कंपनीचे अधिकारी, भूसंपादन अधिकारी, मनपा, महसुल विभागाचे अधिकारी यांचा सहभाग राहणार आहे. सदर राष्ट्रीय लोकअदालतीत मोठ्या संख्येने प्रकरणात तडजोड होण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्रीराम जगताप व न्यायाधीश आर. एस. रोटे यांनी केले असुन सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. 
     


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: National Lok Adalat on December 12 in Nanded district