nanded
nandedsakal

Nanded News : वाहतूक नियमांची विद्यार्थ्यांनी केली जनजागृती ; पोलिस अधीक्षक कार्यालयात ‘एनसीसी’च्‍या विद्यार्थ्यांचा गौरव

वाहतुकीची कोंडी होऊ नये, तसेच वाहतुक सुरळीत रहावी, यासाठी शहर वाहतूक शाखेच्या वतीने वाहतुक नियमांच्याबाबत जनजागृती अभियान सुरू करण्यात आले आहे. या अभियानात उत्स्फूर्त सहभाग नोंदविल्याबद्दल एनसीसीच्या विद्यार्थ्यांचा पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

नांदेड : वाहतुकीची कोंडी होऊ नये, तसेच वाहतुक सुरळीत रहावी, यासाठी शहर वाहतूक शाखेच्या वतीने वाहतुक नियमांच्याबाबत जनजागृती अभियान सुरू करण्यात आले आहे. या अभियानात उत्स्फूर्त सहभाग नोंदविल्याबद्दल एनसीसीच्या विद्यार्थ्यांचा पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

वाहनधारक आणि नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी, यासाठी वेगवेगळे फलक तयार करण्यात आले आहे. त्यावर विविध नियमांची आणि त्याचे पालन न केल्यास कोणत्या कलमाखाली कोणत्या प्रकारची कारवाई करण्यात येते, ही माहिती असलेले फलक हातात घेऊन विद्यार्थी शहरातील प्रमुख मार्गांवर तसेच चौकात सकाळी दोन तास आणि संध्याकाळी दोन तास असे चार तास रहदारीच्या वेळेस उभे होते. या मोहिमेत सायन्स महाविद्यालयाच्या एनसीसीच्या विद्यार्थ्यांचा सकाळी २० आणि संध्याकाळी २० अशाप्रकारे ४० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.

त्यामुळे या विद्यार्थ्यांचा पोलिस अधीक्षक कार्यालयात जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. यावेळी शहर वाहतुक शाखेचे पोलिस निरीक्षक सुर्यमोहन बोलमवाड उपस्थित होते.

nanded
Nanded Municipal Corporation : महापालिकेला मिळाले सव्वाचार कोटींचे उत्पन्न ; २६ गाळे,ऑनलाइन पहिलाच प्रयोग

‘एनसीसी’च्या विद्यार्थ्यांची मदत

वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी शहर वाहतूक शाखेने नवा प्रयोग सुरू केला आहे. वाहनधारकांसह नागरिकांना वाहतूक नियमांची माहिती देण्यासाठी जनजागृती सुरू केली आहे. त्यासाठी विविध शाळा, महाविद्यालयातील एनसीसीच्या विद्यार्थ्यांची मदत घेण्यात येत आहे. जास्तीत जास्त जणांपर्यंत नियमांची माहिती व्हावी व नियम मोडल्यास काय दंड होऊ शकतो, कोणत्या प्रकारची कारवाई होते, याची माहिती होण्यासाठी जनजागृती करण्यात येत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com