खुशखबर ! नवनिर्वाचित सरपंचांना कोरोनाचे गिफ्ट; गेल्या वर्षांचा 14 व्या वित्त आयोगाचा विकास निधी मिळणार

लक्ष्मीकांत मुळे 
Thursday, 25 February 2021

कोरोनामुळे एका वर्षाच्या विकास निधीचा गिफ्ट नवनिर्वाचित सरपंचांना मिळणार असून विकास कामांचे नियोजन सुरू झाले आहे.

अर्धापूर (नांदेड) : कोरोनाचा परिणाम गेल्या वर्षी सर्वच क्षेत्रावर झाला. विकास कामे बंद होती. त्यामुळे पंचायत समिती व ग्रामपंचायतीला आलेला 14 व्या वित्त आयोगाचा तीन कोटी दहा लाखाचा विकास निधी खर्च केला गेला नाही. त्यामुळे हा निधी नवनिर्वाचित सरपंच गावाच्या विकासासाठी उपलब्ध होणार आहे. तसेच 2021 -2022 साठी तीन कोटी दहा लाखाचा निधी उपलब्ध होणार आहे. कोरोनामुळे एका वर्षाच्या विकास निधीचा गिफ्ट नवनिर्वाचित सरपंचांना मिळणार असून विकास कामांचे नियोजन सुरू झाले आहे.

नांदेडमधील बातम्यांसाठी येथे क्लिक करा 

तालुक्यातील ग्रामपंचायतींना 14 व्या वित्त आयोगाचा गेल्या वर्षी निधी मिळाला होता. पण गेल्या वर्षी कोरोनाचा फटका विविध विकास कामांना बसला. ग्रामपंचायतींना लोखसंख्याच्या प्रमाणात निधी देण्यात येतो. तालुक्यातील 39 ग्रामपंचायतींना गेल्या वर्षी 14 व्या वित्त आयोगातून लोकसंख्येच्या प्रमाणात तीन कोटी दहा लाखाचा निधी मिळाला होता. पण हा निधी तत्कालीन सरपंचांना विकास कामांवर खर्च करता आला नाही.  

अर्धापूरकरांनो सावधान; पांगरीत आढळले नव्याने कोरोनाचे दोन रूग्ण

तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुका कोरोनामुळे घेता आल्या नाहीत. मुदत संपलेल्या सर्वच ग्रामपंचायतीवर प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली. या प्रशासकांनी अत्यावश्यक तेवढी कामे केली. पण या विकास निधीतून कामे झाली नाहीत, हा निधी तसाच राहिला. याचा फायदा नुकत्याच निवड झालेल्या सरपंचांना होणार आहे. या नवनिर्वाचित सरपंच गेल्या वर्षाच्या व चालू 2021 - 2022 चा 15 व्या वित्त आयोगाचा विकास निधी उपलब्ध होणार आहे. या दोन्ही वर्षाच्या विकास कामांचे नियोजन करावे लागणार असून त्यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत विविध विकास कामांवर चर्चा करून नियोजन करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

या 14 व 15 व्या निधी खर्चाबाबत मार्गदर्शक सूचना करण्यात आल्या आहेत. कोणती कामे घ्यावीत, कोणत्या कामांवर किती खर्च करावा, प्राधान्यक्रमाने करण्यात येणारी कामे याबाबत स्पष्ट सूचना आहेत. यात मानवी निर्देशांक वाढविणारे कामे घेण्यात यावी. यात आरोग्य, स्वच्छता, शिक्षण, पाणी आदी कामे करण्याच्या सूचना आहेत. कोरोनामुळे गेल्या वर्षीचा विकास निधी उपलब्ध होणार असल्यामुळे नवनिर्वाचित सरपंच मात्र खुशीत आहेत. तसेच पंचायत समितीला दोन वर्षाचा सुमारे 38 लाखांचा निधी मिळणार आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The newly elected sarpanch will get a gift of one year development fund