टपाल जीवन विमाधारकाच्या वारसाला एकोणिस लाखाचा धनादेश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

१९ लाखाचा धनादेश

टपाल जीवन विमाधारकाच्या वारसाला एकोणिस लाखाचा धनादेश

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : येथील पोलिस मुख्यालयातील महिला कर्मचारी ( Nanded Police Ashwini Ledale) अश्विनी लेडाळे यांनी एक वर्षापूर्वी डाक जीवन विमा ( Post Life Insurance) घेतला होता. पण काही महिन्यांपूर्वी दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला. त्यांनी एक वर्षे डाक जीवन विमा पॉलसीचे सुरुळीत हाप्ते भरले होते. त्यामुळे टपालविभागाच्या वतीने त्यांच्या वारसाला १९ लाखाचा धनादेश देऊन संकटात मदत केली. (Nineteen- lakh- checks- nominis- of postal- life- insured)

टपाल जीवन विमा धारकाचे वारस वडील शिवाजी नेमाजी लेडाळे यांना नांदेडचे साहयक डाक अधीक्षक मुख्यालय श्री. मुंडे यांच्या हस्ते एकोणिस लाखाचा धनादेश देण्यात आला. यामुळे टपाल जीवन विमा धारकाच्या कुटुंबियांना संकटकाळी डाक विभागाचा मोठा आधार मिळाला असल्याचे डाक जीवन विमा धारकाच्या वारसांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

हेही वाचा - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शशीधरन आणि विजयन यांना ट्विटरवरून शुभेच्छा दिल्या आहेत.

यावेळी सहायक डाक अधीक्षक श्री. मुंडे यांनी आपले विचार मांडताना म्हणाले की ईतर विमा कंपन्यापेक्षा डाक जीवन विमा व ग्रामीण डाक जीवन विमा योजना कर्मचारी व शेतकऱ्यांच्या हितासाठी चांगल्या आहेत. डाक जीवन विमा योजनेमध्ये हप्ता कमी मिळणारी रक्कम जास्त असते.

ग्रामीण भागातील व्यापारी शेतकरी यांना देखील कर्मचाऱ्यांप्रमाणे दहा लाख विमा घेता येतो. तसेच खासगी डॉक्टर, इंजिनिअर, वकील, यांना देखील डाक जीवन विमा घेता येतो. त्यांनी टपाल जीव विमा योजनेचा लाभ घ्यावा असे अहवान केले आहे.

यावेळी डाक जीवन विमा विकास अधिकारी सुरेश वाघमारे, श्री. सिंगेवार, डाक साहयक शंकर मूगदळे, मुदलकर, श्रीमती कांबळे, डाक जीवन विमा विभागाचे कैलास बडूरवार व कर्मचारी उपस्थित होते.

loading image
go to top