नांदेड : ग्रामसभेत मुख्य समस्यावर चर्चाच नाही | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gram sabha

नांदेड : ग्रामसभेत मुख्य समस्यावर चर्चाच नाही

बारड - बऱ्याच कालावधी नंतर घेण्यात आलेल्या ग्रामसभेत लोकसेवकाने वापरलेली अरेरावीने ग्रामस्थ आवाक झाले असून प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनीही ग्रामसभेकडे पाठ फिरविल्याने समस्येवर बोट न ठेवण्याचा वटहुकूम काढत गावातील मुख्य समस्यावर हात झटकल्याची चर्चा चांगलीच रंगली आहे. लोकशाहीत ग्रामसभेला एक महत्वाचे स्थान आहे. गावातील नागरिकांच्या मूलभूत गरजा व समस्या या महत्वपूर्ण विषयावर चर्चा होऊन त्या सोडविणे अपेक्षित असते. परंतु काही ग्रामपंचायतीत मात्र मालकशाही व एकाधिकारशाही वावरणाऱ्या सत्ताधीशांच्या प्रवाहात सर्वसामान्य नागरिकांनी मांडलेल्या समस्यांवर बोट ठेवल्याने ग्रामसभेतच दम दिल्या जातो हे कशाचे द्योतक आहे. ग्रामसभा ही अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत, व्हिडीओ चित्रीकरण आणि पोलिस बंदोबस्तात घेण्यात यावी अशी जिल्हा प्रशासनाला लेखी निवेदनाद्वारे कळविण्यात आले होते परंतु प्रशासनाचे अधिकारी फिरकलेच नसल्याने प्रशासनाचा हलगर्जीपणा समोर आला आहे.

महाराष्ट्र दिनी ग्रामपंचायत आवारात ग्रामसभेचे आयोजन केले होते. संबंधित ग्रामसभेची अधिसूचना सात दिवस अगोदर न काढता त्याची उद्घोषणा एक दिवस अगोदर सायंकाळी करण्यात आली होती. त्यावरही ग्रामस्थ आवाक झाले होते. ग्रामसभेत एका मागासवर्गीय कुटुंबाने वैयक्तिक नळ जोडणी मागितली असता अरेरावीची भाषा वापरत लोकप्रतिनिधीने ही मागणी उधळून लावली. परस्पर घर नोंदीचे आठ नंबर उताऱ्यास घेऊन अनेक वर्षांपासून वास्तव्यात असणाऱ्या गोरगरीब नागरिकांना वेठीस धरण्याच्या विषयावर लक्ष वेधले असता अरेरावीची भाषा वापरून ग्रामसभा विसर्जित करण्यात आली. या वेळी ग्रामसेवक श्रीवास्तव यांनी कामकाज पाहिले. या वेळी सरपंच प्रभाकर आठवले, उपसरपंच बाळासाहेब देशमुख, माजी उपसरपंच प्रताप देशमुख, राहूल आठवले, माणिक लोमटे, नरसिंग आठवले, अनुराग आठवले, प्रदीप देशमुख, शिवाजी देशमुख, विजय देशमुख, प्रकाश देशमुख, किशोर पिलेवाड, पिराजी गाडेकर, रामेश्वर गोडसे आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: No Discussion On Main Issue In Gram Sabha

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top