आरेच्च नांदेडात पुरुष नसबंदीचा आकडा शोधून सापडेना, महिलांनाच घ्यावा लागतो नसबंदीसाठीही पुढाकार 

शिवचरण वावळे
Thursday, 10 September 2020

बाळाला जन्म देणाऱ्या स्त्रीचादेखील बाळासोबत दुसरा जन्म होतो असे म्हणतात. इतक्या असह्य वेदनेतून स्त्रीला जावे लागते. हे खरे असले तरी नसबंदीसाठी करताना पुरुष कधीच स्वतःहून पुढाकार घेत नसल्यामुळे इथेही नसबंदीसाठी महिलांनाच धाडसाने पुढाकार घ्यावा लागतो.

नांदेड -  शासनाने कुटुंब कल्याणाच्या कितीही योजना राबविल्या तरी, नसबंदीसाठी पुरुषांच्या मनातील भीती अजुनही गेली नाही. किंवा जुन्या मानसिकतेतून अजूनही पुरुष बाहेर आले नसल्यामुळे जिल्ह्यात नसबंदी केलेल्या पुरुषांची आकडेवारी शोधूनही सापडेना अशीच वस्तूस्थिती आहे. 

जिल्ह्यातील सर्वात मोठ्या विष्णुपुरीच्या डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालय वर्षाकाठी आठ ते दहा हजार महिलांची प्रसूती होते. यातील अडीच ते तीन हजार महिलांचे सिझेरियन होते. बाळाला जन्म देणाऱ्या स्त्रीचादेखील बाळासोबत दुसरा जन्म होतो असे म्हणतात. इतक्या असह्य वेदनेतून स्त्रीला जावे लागते. हे खरे असले तरी नसबंदीसाठी करताना पुरुष कधीच स्वतःहून पुढाकार घेत नसल्यामुळे इथेही नसबंदीसाठी महिलांनाच धाडसाने पुढाकार घ्यावा लागतो. मागील तीन वर्षांची नसबंदीची आकडेवारी बघता शासकीय रुग्णालयात एकाही पुरुषाने नसबंदी केल्याचे आढळुन येत नाही. 

हेही वाचा- संगणक साक्षरते अभावी ऑनलाइन शिक्षणात सत्तर टक्के विद्यार्थ्यांना अडथळा

लॉकडाउनमध्ये नसबंदी रखडली

विष्णुपुरीच्या शासकीय रुग्णालयाच्या स्त्रीरोग व प्रसुतीशास्त्र विभागात २०१९ साली एकुण - २५३ स्त्रीयांची नसबंदी शस्त्रक्रिया यशस्विरित्या पार पडली. पुरुषांमध्ये नसबंदी करण्याची सुविधा उपलब्ध असताना एकाही पुरुषाने नसबंदी केल्याचे आढळत नाही. त्यामुळे समाजात पुरुषांच्या नसबंदीसाठी आजही जनजागृतीची मोठी गरज आहे. स्त्रीया या स्वयंस्फूर्तीने स्वतः होऊन सदर स्त्री कुटंब नियोजनाच्या शस्त्रक्रियेसाठी पुढाकार घेतात, सदर स्त्रीयांची ही शस्त्रक्रीया सिझेरिअन प्रसंगी, गर्भपातावेळी (पहिले १२ आठवडेपर्यंत) व प्रसुतीपश्चात करता येते. ही स्त्री कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रीया स्त्रीरोग व प्रसुतीशास्त्र सद्य परिस्थितीत कोरोना संसर्गामुळे अशा शस्त्रक्रियेसाठी येणाऱ्या महिलांची संख्या खुपच मंदावली आहे.

हेही वाचा- गंभीर - रामघाटावर अंत्यविधीला नांदेडकरांची ‘या’ कारणासाठी होतेय अडवणूक ​

स्त्रीबीजनलिका परत जोडल्या जाण्याचे प्रमाणे शुन्य

 ही शस्त्रक्रिया तातडीने किंवा आपत्कालीन परिस्थितीमध्ये न करता अतिशय गुंतागुंतीची असल्याने नियोजन पध्दतीने शस्त्रक्रिया करणे गरजेचे असते. या शस्त्रक्रियेदरम्यान भुलरोग तज्ञांची उपस्थिती असणे आवश्यक आहे. ज्यामुळे वेदनारहित व प्रसंगी काही गुंतागृत होत असल्यास ह्या भुलरोग तज्ज्ञांची मदत अवश्‍यक असते. पोट उघडून नसबंदी शस्त्रक्रिया केल्यानंतर पाच ते सात दिवस तर दुर्बीनीद्वारे शस्त्रक्रिया केल्यास २४ ते ४८ तासाकरिता महिलेस रुग्णालयात दाखल व्हावे लागते. सदर शस्त्रक्रियेपश्चात स्त्रीबीजनलिका परत जोडल्या जाण्याचे प्रमाणे शुन्य पॉईंट एक ते शुन्य पॉईंट पाच टक्के एवढे असते व त्यामुळे क्वचीत प्रसंगी फेल होऊ शकते. 

अशी आहे तीन वर्षातील आकडेवारी

मागील वर्षी एकूण- २५३ शस्त्रक्रिया प्रामुख्याने दुर्बीणीद्वारे करण्यात आलेले आहेत. 
तीन वर्षाची आकडेवारी खालील प्रमाणे 
-सन - २०१७ - २३२ 
-सन - २०१८- ४५३ 
-सन - २०१९ - २५३ 

पुरुषांमध्ये जनजागृतीची गरज 
 पुरुषांमध्ये संकुचित वृतीमुळे नसबंदीसाठी पुरुष कधीच पुढाकार घेत नाहीत. नसबंदीसाठी देखील महिलांनाच पुढाकार घ्यावा लागतो. त्यामुळे पूर्वीप्रमाणेच पुरुषांमध्ये आजही जनजागृतीची होणे तितकीच गरज आहे. 
- डॉ.एस.आर वाकोडे, प्राध्यापक व विभाग प्रमुख, स्त्रीरोग व प्रसुतीशास्त्र विभाग.  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: No number of male sterilization can be found in Nanded of Arech, only women have to take initiative for sterilization Nanded News