esakal | लस,मास्क नाही तर मोदक नाही! जिल्हाधिकाऱ्यांच्या घरी देखावा
sakal

बोलून बातमी शोधा

नांदेड - जिल्हाधिकारी डॉ. विपीन ईटनकर यांच्या पत्नी डॉ. शालिनी यांनी स्वतः इकोफ्रेंडली गणेशमूर्ती साकारून जिल्हाधिकारी निवासस्थानी प्रतिष्ठापना केली आहे.

लस,मास्क नाही तर मोदक नाही! जिल्हाधिकाऱ्यांच्या घरी देखावा

sakal_logo
By
प्रमोद चौधरी

नांदेड - गणरायाचे शुक्रवारी (ता.दहा) सर्वत्र आगमन झाले असून विविध मंडळांनी आपापल्या पद्धतीने प्रबोधनपर संदेश देणारे देखावे साकारले आहेत. येथील जिल्हाधिकारी डॉ. विपीन ईटनकर (IAS Vipin Itankar) यांच्या पत्नी डॉ. शालिनी यांनी स्वतः इकोफ्रेंडली गणेशमूर्ती (Econfriendly Ganesh Idol) साकारून जिल्हाधिकारी निवासस्थानी प्रतिष्ठापना केली आहे. डॉ. विपीन यांनी आपल्या संकल्पनेतून कोरोनामुक्तीचा संदेश देणारा देखावा तयार केला आहे.डॉ. विपीन ईटनकर नेहमीच कुठल्या ना कुठल्यातरी माध्यमातून समाजोपयोगी संदेश देत असतात. गणेशोत्सवातही (Nanded) त्यांनी तसे केले आहे. डॉ. शालिनी यांनी स्वयंस्फूर्तीने इकोफ्रेंडली गणपतीची मूर्ती साकारली व तिची प्रतिष्ठाना केली. इंजेक्शनधारी डॉक्टरची प्रतिकृती, कोव्हॅक्सिन, कोव्हिशिल्डच्या लसी, एन-९५चा मास्क, सॅनिटायझरची बाटली आदींतून देखावा साकारला आहे. त्यातून कोरोनामुक्तीचा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. ‘दोन व्हॅक्सिन घेतले असेल तरच मोदक मिळेल’, ‘मास्क लावला नाही तर मोदक नाही’ अशा मजुकाराचा फलकही लावला आहे. तेथील (Ganesh Festival) वैशिष्ट्यपूर्ण दिव्यांवरहील'मास्क लावा, स्वच्छ हात धुवा, सुरक्षित अंतर ठेवा’आदी संदेश देण्यात आले आहेत.

हेही वाचा: दिलासा! नांदेडमध्ये केवळ एकच जण कोरोना पॉझिटिव्ह

‘सर्वांनी दोन लसी घ्याव्यात’

जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानची गणेशमूर्ती व देखावा पाहण्यासाठी त्यांचे चाहते, अनेक अधिकारी, कर्मचारी येत आहेत. असाच संदेश इतर मंडळांनी तयार करावा, कोरोना नियम पाळण्यासंदर्भात जागृती करावी अशी अपेक्षा व्यक्त करून सर्वांनी दोन लसी घ्याव्यात, असा आग्रह डॉ. विपीन, डॉ. शालिनी यांनी केला आहे.

loading image
go to top