शहरामुळे नव्हे तर यामुळे वाढली जिल्हा प्रशासनाची चिंता

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 मे 2020

नांदेड : लॉकडाउनमध्ये राज्यासह जिल्ह्याच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे एका जिल्ह्यातूनच काय पण एका गावातून दुसऱ्या गावात प्रवेश निषेध करण्यात आला आहे. तरी देखील रात्रीच्या वेळी अनेक प्रवाशी मोठ्या शहरातून गावाकडे पायपीट करत रात्री बे रात्री थेट गावात दाखल होत आहेत. त्यामुळे कोरोना आजार आता गाव खेड्यात पाय पसरताना दिसून येत आहे. 

नांदेड : लॉकडाउनमध्ये राज्यासह जिल्ह्याच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे एका जिल्ह्यातूनच काय पण एका गावातून दुसऱ्या गावात प्रवेश निषेध करण्यात आला आहे. तरी देखील रात्रीच्या वेळी अनेक प्रवाशी मोठ्या शहरातून गावाकडे पायपीट करत रात्री बे रात्री थेट गावात दाखल होत आहेत. त्यामुळे कोरोना आजार आता गाव खेड्यात पाय पसरताना दिसून येत आहे. 

पंतप्रधान मोदी यांनी गाव खेडी कोरोनासारख्या महामारीपासून दूर कशी ठेवता येतील, यासाठी सर्व ते प्रयत्न करण्याच्या सूचना राज्य सरकारला दिल्या आहेत. परंतु रात्री बे रात्री गावात दाखल होणाऱ्या प्रवाशांमुळे जिल्हा प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. जिल्ह्यातील माहूर आणि त्यानंतर बारड येथे प्रत्येकी एक कोरोना बाधीत रुग्ण आढळून आला आहे. यामुळे जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून सर्व ती खबरदारी घेण्यास सुरुवात झाली आहे. जिल्हा परिषद आरोग्य विभाग केंद्रावर फिवर क्लिनिक व कोविड केअर सेंटर सज्ज ठेवण्यात आली आहेत. 

हेही वाचा- नांदेड जिल्ह्यातील परप्रांतीयांना लालपरीची साथ

त्या पंधरा जणांच्या स्वॅबची प्रतिक्षा 

दोन दिवसापूर्वी बारड येथे आलेल्या तीन युवकांची फिवर क्लिनिकमध्ये तपासणी करण्यात आली होती. त्यापैकी एक युवक कोरोना पॉझिटिव्ह तर दोघांचा अहवाल निगेटिव्ह आढळून आला आहे. दरम्यान, या तिघांच्या संपर्कातील १५ लोकांच्या स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. बुधवारी (ता.१३) सायंकाळपर्यंत त्यांचे नमुने अहवाल येण्याची शक्यता आहेत. त्यामुळे त्या पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील १५ जणांचे अहवाल नेमके कसे येणार? याकडे जिल्हा प्रशासनाचे लक्ष लागले आहे. 

हेही वाचा-  नांदेडला दिलासा : अबचलनगरच्या पहिल्या रुग्णाची कोरोनावर मात...

१६ फीवर क्लिनिक सुरु

जिल्हा परिषदेच्या १२ रुग्णालयात फिवर क्लिनिक आणि कोविड केअर सेंटर सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. मुखेड येथे स्वतंत्र ‘डेडीकेटेड’ कोविड हॉस्पिटलची उभारणी करण्यात आली आहे. तीन उप जिल्हा रुग्णालयात डेडीकेटेड कोविड हेल्थ केअर सेंटर सुरु करण्यात आली आहेत. तर इतर १६ फीवर आणि कोविड केअर सेंटर सुरु करण्यात आली आहेत. 

गाव खेड्यापर्यंत कोरोनाचे लोन पसरु नये

 जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत सर्व ती खबरदारी घेतली जात आहे. नागरीकांच्या आरोग्य तपासणी सुरु आहे. मुंबईहून परत बारडला आलेल्या त्या तिन्ही युवकांची फिवर क्लिनिकमध्ये तपासणी करण्यात आली होती. त्यांचे स्वॅब घेण्यात आले होते. त्यातील एकाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. अजून संपर्कातील १५ जणांचे रिपोर्ट येणे बाकी आहे.
- डॉ. बी. एम. शिंदे, जिल्हा आरोग्य अधिकारी, नांदेड  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Not Because Of The City But Because Of The District Administration's Concern Nanded News