नांदेडला कोरोनाग्रस्तांचा आकडा अडीच हजारावर

अभय कुळकजाईकर
Tuesday, 4 August 2020

आत्तापर्यंत १७ हजार ७५८ स्वॅब घेण्यात आले असून त्यापैकी १३ हजार ५३७ स्वॅब निगेटिव्ह आले आहेत. मंगळवारी प्राप्त झालेल्या ७२९ अहवालापैकी ५७३ स्वॅब निगेटिव्ह आले आहेत. तसेच १३७ स्वॅब पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे आता पॉझिटिव्ह रुग्ण संख्या दोन हजार ४९६ एवढी झाली आहे.

नांदेड - गेल्या चार पाच दिवसापासून पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढतच चालली असून मंगळवारी (ता. चार) १३७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्याचबरोबर ५३ जणांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. तसेच दिवसभरात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, ३७ रुग्णांना औषधोपचारानंतर रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.
 
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी ही माहिती दिली. आत्तापर्यंत १७ हजार ७५८ स्वॅब घेण्यात आले असून त्यापैकी १३ हजार ५३७ स्वॅब निगेटिव्ह आले आहेत. मंगळवारी प्राप्त झालेल्या ७२९ अहवालापैकी ५७३ स्वॅब निगेटिव्ह आले आहेत. तसेच १३७ स्वॅब पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे आता पॉझिटिव्ह रुग्ण संख्या दोन हजार ४९६ एवढी झाली आहे. आरटीपीसीआर तपासणीद्वारे ७२ तर ॲन्टीजेन टेस्ट किट तपासणीद्वारे ६५ असे १३७ स्वॅब पॉझिटिव्ह आले आहेत. 

हेही वाचा - नांदेड : शहर वाहतुक शाखेतील महिला पोलिसांचा वाहनधारकांना मनस्ताप

५३ रुग्णांची प्रकृती गंभीर
मंगळवारी ३७ कोरोना बाधित रुग्णांना औषधोपचारानंतर रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे सुटी दिलेल्या रुग्णांची संख्या आत्तापर्यंत एक हजार ५७ एवढी झाली आहे. त्याचबरोबर सध्या एक हजार ३२९ पॉझिटिव्ह रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. त्यापैकी ५३ रुग्णांची प्रकृती गंभीर असून त्यात ३७ महिला आणि १६ पुरुषांचा समावेश आहे. आज मंगळवारी मृत्यू पावलेल्या रुग्णांमध्ये सिडको येथील ५६ वर्षीय पुरुष, विद्युतनगर नांदेड येथील ६५ वर्षाचा पुरुष तसेच इस्लामपूर येथील ४५ वर्षाचा पुरुषाचा समावेश आहे. 

एक हजार ३२९ रुग्णांवर उपचार सुरु
सध्या एक हजार ३२९ रुग्णांवर उपचार सुरु असून त्यात विष्णुपुरीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात १२६, पंजाब भवन कोविड सेंटरला ४७२, जिल्हा रुग्णालयात ४१, नायगावला ७०, बिलोलीला ३३, मुखेडला १०७, देगलूरला १०२, लोह्यात सात, हदगावला ९०, भोकरला चार, उमरीला १४, कंधारला १५, धर्माबादला २९, किनवटला २३, अर्धापूरला ११, मुदखेडला दहा, हिमायतनगर कोविड सेंटरला २० रुग्णांचा समावेश आहे. तसेच नांदेडला खासगी रुग्णालयात १४७ रुग्ण दाखल आहेत तर औरंगाबादला पाच, निजामाबादला एक, हैदराबादला एक आणि मुंबईला एक रुग्ण संदर्भित करण्यात आले आहेत. 

मंगळवारी दिवसभरात तालुकानिहाय बाधित रुग्णसंख्या
नांदेड शहर - ३२, नांदेड ग्रामिण - एक, लोहा - आठ, भोकर - तीन, देगलूर - ३२, हदगाव - १२, कंधार - एक, किनवट - एक, मुखेड - दहा, नायगाव - आठ, उमरी - तीन तसेच उज्जैन (मध्यप्रदेश) येथील एक व तोफखाना हिंगोली येथील एका रुग्णाचा समावेश आहे. 

हेही वाचा - नांदेड जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांचे द्विशतक

आत्तापर्यंतचे नांदेडचे कोरोना मीटर

  • सर्व्हेक्षण - एक लाख ४९ हजार ५१८
  • घेतलेले स्वॅब - १७ हजार ७५८
  • निगेटिव्ह स्वॅब - १३ हजार ५३७
  • एकूण पॉझिटिव्ह रुग्ण - दोन हजार ४९६
  • एकूण मृत्यू - ९७
  • एकूण रुग्णालयातून सुटी झालेले रुग्ण - एक हजार ५७
  • आजचे पॉझिटिव्ह रुग्ण - १३७
  • आजचे मृत्यू - तीन
  • आज रुग्णालयातून सुटी झालेले रुग्ण - ३७ 
  • रुग्णालयात उपचार सुरु असलेले रुग्ण - एक हजार ३२९

  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The number of corona victims in Nanded is over two and a half thousand, Nanded news