नांदेड जिल्ह्यात अतिगंभीर रुग्णांचे प्रमाण वाढले; रविवारी १८ बाधितांचा मृत्यू, एक हजार ३१० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह  | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

file Photo

रविवारी (ता.२८) चार हजार २९९ अहवाल प्राप्त झाले. यामधील दोन हजार ८५० निगेटिव्ह तर एक हजार ३१० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

नांदेड जिल्ह्यात अतिगंभीर रुग्णांचे प्रमाण वाढले; रविवारी १८ बाधितांचा मृत्यू, एक हजार ३१० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह 

नांदेड - नव्याने प्राप्त होत असलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या अहवालात पॉझिटिव्ह रुग्णांची नवी अकडेवारी आणि त्या सोबतच अतिगंभीर रुग्णांच्या मृत्यूचे वाढत असलेले प्रमाण यामुळे नांदेड जिल्हा राज्यातील दहा शहराच्या कोरोना हॉटस्पॉटच्या यादीत पोहचले आहे. त्यासोबतच नांदेड जिल्ह्यात अतिगंभीर रुग्णांच्या प्रमाणात देखील सर्वाधिक वाढ झाली आहे. 

शनिवारी (ता.२७) तपासणीसाठी घेण्यात आलेल्या स्वॅब अहवालापैकी रविवारी (ता.२८) चार हजार २९९ अहवाल प्राप्त झाले. यामधील दोन हजार ८५० निगेटिव्ह तर एक हजार ३१० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या ३९ हजार ९०८ इतकी झाली आहे. 

हेही वाचा- पंडित नाथराव नेरलकर यांच्या निधनाने संगीत क्षेत्र पोरके झाले

आत्तापर्यंत जिल्ह्यात ७३१ बाधितांचा मृत्यू 

रविवारी चिखलवाडी नांदेड पुरुष (वय ७४), सिद्धीविनायक अपार्टमेंट नांदेड महिला (वय ५८), चितळी तालुका लोहा महिला (वय ६०), इंदिरा नगर लोहा पुरुष (वय ५५), सिडको नांदेड पुरुष (वय २५) बोरगाव ता. लोहा पुरुष (वय ६५), तरोडा (बु.) पुरुष (वय ७६), बळीरामपूर पुरुष (वय ५०), होळी नांदेड पुरुष (वय ८२) या नऊ बाधितांवर विष्णुपुरीच्या शासकीय रुग्णालयात, हिंगोली नाका नांदेड पुरुष (वय २९), भोकर पुरुष (वय ५२), आंबेडकरनगर नांदेड महिला (वय ६५), भगतसिंग रोड नांदेड पुरुष (वय ८५), गुरुद्वारा गेट नं.चार महिला (वय ५०) या पाच बाधितांवर जिल्हा शासकीय रुग्णालयात, दिलिपसिंग कॉलनी पुरुष (वय ७०) यांच्यावर शासकीय आयुर्वेदिक रुग्णालय तर पाथरड ता. हदगाव महिला (वय ६०), तामसा ता. हदगाव महिला (वय ५०) यांच्यावर हदगाव कोविड सेंटरमध्ये तर पूर्णा रोड नांदेड पुरुष (वय ४८) या रुग्णांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. वरील १८ बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आत्तापर्यंत जिल्ह्यात ७३१ बाधितांचा मृत्यू झाला आहे. 

हेही वाचा- बिबट्याच्या हल्ल्यात दोन वासरे ठार; हदगाव तालुक्यातील ठाकरवाडी येथील घटना

एक हजार ३१० जणांचे अहवाल 

रविवारी नांदेड वाघाळा महापालिकेंतर्गत -८१० , नांदेड ग्रामीण -२८, लोहा -६६, कंधार -३८, मुदखेड -२६, बिलोली-१५, हिमायतनगर -२६, माहूर -आठ, उमरी -२९ , देगलूर -५२, भोकर -१४, नायगाव -२१, धर्माबाद -नऊ, अर्धापूर -३१, किनवट -५०, मुखेड -२१, हदगाव -५३, परभणी -सहा व हिंगोली - दोन, आदीलाबाद - दोन, यवतमाळ - तीन असे एक हजार ३१० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. 
 

Web Title: Number Critically Ill Patients Increased Nanded District Sunday 18 Victims Died 1310

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..