esakal | रुग्ण वाढल्याने महापालिका झाली खडबडून जागी...
sakal

बोलून बातमी शोधा

नांदेड महापालिका

कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या तब्बल ९७ पर्यंत गेल्यामुळे आता आणखी उपाययोजना करण्यासाठी नांदेड वाघाळा महापालिका खडबडून जागी झाली आहे. महापालिकेत सोमवारपासून (ता. १८) अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कामावर येणे बंधनकारक असून शंभर टक्के उपस्थिती असली पाहिजे, असे आदेश महापालिका आयुक्त डॉ. सुनील लहाने यांनी काढले आहेत. 

रुग्ण वाढल्याने महापालिका झाली खडबडून जागी...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नांदेड - कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या तब्बल ९७ पर्यंत गेल्यामुळे आता आणखी उपाययोजना करण्यासाठी नांदेड वाघाळा महापालिका खडबडून जागी झाली आहे. महापालिकेत सोमवारपासून (ता. १८) अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कामावर येणे बंधनकारक असून शंभर टक्के उपस्थिती असली पाहिजे, असे आदेश महापालिका आयुक्त डॉ. सुनील लहाने यांनी काढले आहेत. 

कोरोना पॉझिटिव्हचे रुग्ण वाढत चालल्यामुळे तसेच त्या अनुषंगाने कामेही वाढत असल्याने सोमवारपासून (ता. १८) नांदेड महापालिकेत सर्व कार्यालयांमध्ये अधिकारी, कर्मचाऱ्यांची शंभर टक्के उपस्थिती अनिवार्य आहे. जे कर्मचारी यापुढे अनुपस्थित राहतील त्यांची अनुपस्थिती नोंदविण्यात येणार असल्याचे आदेश आयुक्त डॉ. सुनील लहाने यांनी काढले आहेत.

हेही वाचा - व्यापाऱ्यांना दिलासा - नांदेडला अशी सुरु राहणार दुकाने...

रुग्ण वाढत असल्याने निर्णय
कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी शासन आदेशानुसार महापालिकेतील अत्यावश्‍यक सेवा वगळता इतर सर्व कार्यालयांमध्ये पाच टक्के कर्मचारी काम करत होते. त्यानंतर दहा टक्के कर्मचारी काम करत होते. पण आता नांदेड शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्याचबरोबर कंटेनमेंट झोनमध्येही रुग्ण वाढत असून त्या अनुषंगाने कामेसुद्धा वाढत असल्याने आयुक्तांनी हा निर्णय घेतला असून त्या बाबतचे आदेश शनिवारी (ता. १६) काढण्यात आले आहेत.
कोरोनाचे रुग्ण वाढल्याने प्रत्येकाला कामावर येणे बंधनकारक आहे. 

युद्धपातळीवर कामे सुरु
दरम्यान, कोरोनाचा रुग्ण आढळल्यानंतर महापालिकेच्या स्वच्छता आणि आरोग्य विभागाच्या वतीने युद्धपातळीवर कामे करण्यात येत आहेत. स्वच्छतेसोबतच फवारणीद्वारे महापालिकेच्या वतीने निर्जतुकीकरण करण्यात येत आहे. त्याचबरोबर सदरील भाग हा कंटेनमेंट झोन जाहीर करुन या ठिकाणी थर्मल स्किनिंगद्वारे नागरिकांची तपासणी आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात येत आहे. त्याचबरोबर जनजागृतीही करण्यात येत आहे. कोरोनाच्या वाढत्या संख्येमुळे कंटेनमेंट झोनची संख्याही वाढत चालली आहे. त्यामुळे आता अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची गरजही वाढली आहे. त्यासाठी महापालिकेच्या वतीने आयुक्तांनी शंभर टक्के उपस्थिती ठेवण्यासाठी आदेश काढले आहेत. 

हेही वाचलेच पाहिजे - सकाळी हादरा सायंकाळी दिलासा : चौघांची कोरोनाच्या विळख्यातून सुटका
   
रजा मंजूर झाल्याशिवाय गैरहजर राहू नये

त्याचबरोबर ज्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मुख्यालय सोडण्याची परवानगी घेतलेली आहे, असे आस्थापनेवरील अधिकारी, कर्मचारी हे आपत्कालीन परिस्थितीत रजा घेऊ इच्छितात त्यांना रजा मंजूर करावी. तसेच वैद्यकीय प्रमाणपत्र सादर न करता परावर्तीत रजासुद्धा शासन निर्णयातील तरतुदीनुसार मंजूर करण्यास हरकत नाही. ज्यांना रजा हवी असेल त्यांना मिळेल, मात्र रजा मंजूर झाल्याशिवाय गैरहजर राहू नये, अशा सूचनाही आयुक्त डॉ. सुनील लहाने यांनी एका आदेशाद्वारे दिल्या आहेत.

loading image
go to top