
सोमवारी (ता. ११) ५१८ स्वॅब अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी ४९० निगेटिव्ह, २५ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
नांदेड ः जिल्ह्यात विष्णुपुरी शासकीय रुग्णालय व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात एक अशा दोन कोरोना स्वॅब चाचणी लॅब आहेत. कोरोनाचा प्रादूर्भाव कमी झाला असला तरी, रोज नव्याने तपासणीसाठी घेण्यात येत असलेल्या स्वॅब अहवालापैकी अतिशय कमी स्वॅबचा अहवाल प्राप्त होत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील प्रलंबित स्वॅब अहवालाची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे.
रविवारी (ता.दहा) तपासणीसाठी घेण्यात आलेल्या स्वॅब अहवालापैकी सोमवारी (ता. ११) ५१८ स्वॅब अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी ४९० निगेटिव्ह, २५ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २१ हजार ८६६ इतकी झाली आहे. सोमवारी दिवसभरात एकाही कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला नाही. त्यामुळे दुसऱ्या दिवशी देखील कोरोनाचा मृत्यूदर ५७८ वर स्थिर आहे.
हेही वाचा- पेट्रोल- डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ नांदेडमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून निषेध रॅली
२८ रुग्ण कोरोनामुक्त
सोमवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील - दोन, नांदेड महापालिकेंतर्गत एनआरआय भवन, गृहविलगीकरण कक्षातील - १३, देगलूर - चार, मुखेड - दोन, खासगी रुग्णालय - सात असे २८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत २० हजार ७३३ रुग्ण कोरोनाचा उपचार घेऊन घरी परतले आहेत.
हेही वाचा - एसटीच्या तिकीट मशीन झाल्या ‘हॅंग’, स्मार्ट कार्ड लागेना
३९६ स्वॅब अहवालाची तपासणी सुरु
सोमवारी नांदेड वाघाळा महापालिका क्षेत्रातील - १४, कंधार - एक, देगलूर - एक, लोहा- दोन, माहूर - एक, भोकर - एक, मुखेड- तीन, बिलोली- एक, पूर्ण - एक असे २५ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील बाधितांची एकूण संख्या २१ हजार ८६६ इतकी झाली असून, सध्या ३५४ बाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. त्यापैकी सात रुग्णांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे. सोमवारी रात्री उशिरापर्यंत ३९६ स्वॅब अहवालाची तपासणी सुरु होती.
नांदेड कोरोना मीटर ः
एकूण पॉझिटिव्ह - २१ हजार ८६६
एकूण बरे - २० हजार ७३३
एकूण मृत्यू - ५७८
सोमवारी पॉझिटिव्ह - २५
सोमवारी बरे - २८
सोमवारी मृत्यू - शुन्य
गंभीर रुग्ण - सात
स्वॅब तपासणी सुरु - ३९६