esakal | पेट्रोल- डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ नांदेडमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून निषेध रॅली
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे पेट्रोल व डिझेलचे भाव दररोज वाढत आहेत. हे भाव सर्वसामान्य नागरिकांना परवडणारे नाहीत

पेट्रोल- डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ नांदेडमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून निषेध रॅली

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : राज्यात पेट्रोल आणि डिझेलचे भाव दररोज वाढत आहेत. पेट्रोल 92 रुपये प्रति लिटर झाले असून या भाववाढीमुळे सर्वसामान्य वाहन चालकांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. पेट्रोल व डिझेलचे भाववाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून शहरातील चिखलवाडी कॉर्नर येथून दुचाकी वाहन ढकलून नेत निषेध करुन निदर्शने करण्यात आली.

केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे पेट्रोल व डिझेलचे भाव दररोज वाढत आहेत. हे भाव सर्वसामान्य नागरिकांना परवडणारे नाहीत. नागरिकांना आर्थिक फटका बसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री कमलकिशोर कदम यांच्या मार्गदर्शनाखाली इंधन दरवाढीच्या निषेधार्थ दुचाकी ढकलत सरकारचा निषेध नोंदविला अशी माहिती रॅलीचे आयोजक राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष रऊफ जमिनदार यांनी दिली. 

हेही वाचा - नांदेड शहरातील एका बिल्डरला उच्च न्यायालयाची नोटीस, बिल्डर लॉबीमध्ये खळबळ

दरम्यान रॅली जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचल्यानंतर निदर्शने करुन जिल्हाधिकारी यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या रॅलीत राष्ट्रवादी युवकचे शहराध्यक्ष रऊफ जमिनदार, उत्तर विधानसभा अध्यक्ष निखील नाईक, शहर जिल्हासचिव गगनदिपसिंघ रामगडीया, जिलानी पटेल, कृष्णा पाटील पुयड, माधव पाटील चिंचाळे, विक्रमसिंह ठाकूर, गुलाम मोबीन, महेंद्र भटलाडे, गजानन राठोड, खदीर कुरेशी, सचिन जाधव, शेख खदीर, लक्कीसिंघ भट्टी, शेख जिलानी, शेख ईमरान, शेख जबार, नारायण पुयड, सुमेध सरपाते, शेख मंगल, आमेर बिल्डर, आतिक बिल्डर, मुजीब बिल्डर, शुभम अंभोरे, कुणाल पाटील, गणेश घाटे, साईनाथ जोगदंड, धम्मदिप कोल्हे, सुमित पठाण, शेख बशीर यांच्यासह आदी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

loading image
go to top