esakal | विनापरवानगी पिस्तुलसह एकाला अटक, स्थागुशाची कारवाई 

बोलून बातमी शोधा

फोटो

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाच्या हाती विनापरवाना पिस्तुल बाळगणारा लागला. त्याच्याकडून ३५ हजार रुपये किंमतीचे गावठी पिस्तुल जप्त केले.

विनापरवानगी पिस्तुलसह एकाला अटक, स्थागुशाची कारवाई 
sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : जिल्ह्यातील घडलेल्या खून, जबरी चोरी, खंडणी, चोरी, घरफोडी या गंभीर गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेत असतांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाच्या हाती विनापरवाना पिस्तुल बाळगणारा लागला. त्याच्याकडून ३५ हजार रुपये किंमतीचे गावठी पिस्तुल जप्त केले. ही कारवाई रविवारी (ता. १२) सायंकाळच्या सुमारास गणराजनगर भागात केली. 

जिल्ह्यातील गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपींना पकडण्याचे व गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी आपल्या सर्व यंत्रणांना आदेश दिले. स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे सहकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक पांडूरंग भारती हे आपल्या पथकासह रविवारी शहरात गस्त घालत होते. त्यांना मिळालेल्या माहितीवरुन भगतसिंग रोडवरील गणराजनगरमधील टॉवर बिल्डींगमध्ये राहणारा हरविंदरसिंग उर्फ हॅरी सुखदेवसिंग हुंदल (वय ३०) हा औरंगाबादला निघत असल्याचे समजले.

हेही वाचा -  नांदेडमध्ये जबरी चोऱ्या वाढल्या, काय आहे कारण...? वाचा

हॅरी हुंदल याला वजिराबाद पोलिसांच्या स्वाधीन

यावेळी त्याचा पाठलाग करत वजिराबाद भागात त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याच्या कबुलीवरून घराची झडती घेतली असता त्याच्याकडून विनापरवाना बेकायदेशिररित्या ३५ हजार रुपये किंमतीचे पिस्तुल जप्त केले. पिस्तुल व हॅरी हुंदल याला वजिराबाद पोलिसांच्या स्वाधीन केले. पांडूरंग भारती यांच्या फिर्यादीवरुन वजिराबाद पोलिस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास फौजदार श्रीमती मुंडे करत आहेत. 

शिवाजीनगर पोलिसांनी दारु पकडली

शिवाजीनगर पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले सहाय्यक पोलिस निरीक्षक रवी वाहूळे यानी आपल्या हद्दीत कारवाई करून अवैधरित्या दारु जप्त केली. लोकमान्य मंगल कार्यालय परिसरात सरवरखान शेरखान पठाण रा. चिखली याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून सात हजार ३३२ रुपयाची विदेशी दारु जप्त केली. दुसऱ्या घटनेत नवी आबादी शिवाजीनगर येथून किरण सुभाष केळकर रा.जयभीमिनगर याच्याकडून अडीच हजाराची देशी दारु जप्त केली.

येथे क्लिक कराधक्कादायक : पोलिस हवालदाराला मारहाण, फाडले कपडे
  
पावणे दोन लाखाचा ऐवज जप्त 

तिसऱ्या कारावईत अल्बाशूजसमोर विजय भिमराव दवणे रा. समिरा बाग, खडकपूरा याच्याकडून चार हजाराची देशी दारु जप्त केली. त्यानंतर चौथ्या कारवाईत विष्णुनगर रस्त्यावर आकाश संजय भोसले रा. सराफा बाजार नांदेड याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून चार हजार १४६ रुपयाची देशी व विदेशी दारु जप्त केली. चार आरोपींविरुद्ध शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांच्याकडून एक लाख ७८ हजाराचा माल जप्त केला. पथकाचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी कौतुक केले.