Nanded : विद्यापीठातील कर्मचाऱ्यांचा एक दिवसीय संप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nanded

Nanded : विद्यापीठातील कर्मचाऱ्यांचा एक दिवसीय संप

नवीन नांदेड : महाराष्ट्र राज्यातील अकृषी विद्यापीठाचे व महाविद्यालयाचे शिक्षकेतर कर्मचारी व अधिकारी यांनी पुन्हा एकदा आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी सोमवारी (ता.२२) लाक्षणिक संप पुकारला. या संपामध्ये स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ कृती समितीने सहभाग घेतला होता. या वेळी शिक्षकेतर कर्मचारी, अधिकारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

आपल्या विविध मागण्या या उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडे प्रलंबित राहिल्या असून त्यावर अनेक वर्षापासून पाठपुरावा करून देखील सदर प्रश्न सुटत नसल्याने या विषयी संताप व्यक्त करत हा एक दिवसाचा लाक्षणिक संप करण्यात आला असल्याचे सांगन्यात आले.शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या न्याय व रास्त मागण्याच्या पूर्ततेसाठी महाराष्ट्र विद्यापीठीय व महाविद्यालयीन संयुक्त कृती समितीच्या वतीने संपूर्ण राज्यातील अकृषी विद्यापीठ आणि शासनाच्या धोरणामुळे आंदोलनाचा पावित्रा कृती समितीस घ्यावा लागला.

एकस्तर पदोन्नती योजना लागू करणे, विद्यापीठ व महाविद्यालयीन कर्मचारी यांची सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचे रद्द केलेले शासन निर्णय पुनर्जीवित करणे, अकृषी विद्यापीठातील ७९६ राहिलेल्या पदांना सातवा वेतन आयोग लागू करणे, विद्यापीठीय शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना ५८ महिन्याची थकबाकी देणे, पाच दिवसाचा आठवडा लागू करावा, २००५ नंतरची जुनी पेन्शन लागू करणे, विद्यापीठातील उपकुलसचिव, सहाय्यक कुलसचिव व समकक्ष पदांना युजीसीच्या शिफारशीनुसार सुधारित वेतन संरचना लागू करण्यात यावी, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची रिक्त पदे त्वरित भरावीत, यासह महत्त्वाच्या १२ प्रमुख मागण्यांच्या पूर्ततेसाठी आंदोलन करण्यात आले.

हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढण्याचा इशारा

राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठीय व संलग्नित महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांच्या कृती समितीने आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी ता.१६ नोव्हेंबर पासून राज्यव्यापी आंदोलन सुरू केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून ता.२२ नोव्हेंबर एक दिवसाचा राज्यव्यापी लाक्षणिक बंद करण्यात आला. सरकारने आता आमच्या प्रलंबित मागण्याची दखल घेतली नाही तर हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.

loading image
go to top