esakal | नांदेडमधील शंभर ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम रद्द, नव्याने होणार प्रक्रिया सुरु 
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

राज्यातील १९ जिल्ह्यांतील एक हजार ५६६ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी २४ फेब्रुवारी २०२० रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात
आला होता.

नांदेडमधील शंभर ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम रद्द, नव्याने होणार प्रक्रिया सुरु 

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे/ कृष्णा जोमेगावकर

नांदेड : ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कोवीडमुळे स्थगित केलेला निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणुक आयोगाने रद्द केल्याची घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी गुरुवारी (ता. १९) केली. यामुळे नांदेड जिल्ह्यामधील निवडणुक प्रक्रिया सुरु झालेल्या शंभर ग्रामपंचायतीचा कार्यक्रम रद्द झाला आहे. या ठिकाणी नव्याने प्रक्रिया सुरु होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातून मिळाली.

राज्यातील १९ जिल्ह्यांतील एक हजार ५६६ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी २४ फेब्रुवारी २०२० रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात
आला होता. त्यानुसार ता. ३१ मार्च २०२० रोजी मतदान होणार होते; परंतु कोविडची परिस्थिती उद्‌भवल्याने ता. १७ मार्च २०२० रोजी उमेदवारी अर्ज
छाननीच्या टप्प्यावर हा निवडणूक कार्यक्रम स्थगित करण्यात आला. यानंतर परिस्थितीत बदल झाल्यानंतर आहे त्या टप्यावरुन पुढे कार्यक्रम सुरु राहिल असे सांगण्यात आले होते. परंतु राज्य निवडणुक आयोगाने गुरुवारी (ता. १९)ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कोवीडमुळे स्थगित केलेला
निवडणूक कार्यक्रम आता रद्द केला. या ठिकाणी नव्याने निवडणुक कार्यक्रम जाहीर करण्यात येणार आहे, अशी घोषणा केल्यामुळे नांदेड जिल्ह्यातील तेरा तालुक्यातील शंभर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम पुन्हा जाहीर होणार आहे. यापूर्वी पॅनल प्रमुखांनी केलेला खर्च पाण्यात गेला आहे.

हेही वाचाऔंढा तालुक्‍यात अतिवृष्टीच्या नुकसानीचे १४ कोटी ९७ लाखाचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार 

निवडणूक कार्यक्रम रद्द झालेल्या तालुकानिहाय ग्रामपंचायती

नांदेड ः ब्राम्हणवाडा, कामठा खुर्द, बोंडार तर्फे हवेली, आलेगाव,
दर्यापूर, पिंपरी महिपाल, कोटतीर्थ, वाडी पुयड, वडगाव, इंजेगाव,
फत्तेपूर, कांकाडी, किकी, धनगरवाडी, खुपसरवाडी, विष्णुपुरी, भनगी,
कल्लाळ, पिंपळगाव निमजी, गंडेगाव, नांदुसा/भालकी, वडवणा/खडकी, तळणी,
चिखली बुद्रुक. 
अर्धापूर ः गणपूर व सांगवी- खडकी.
मुदखेड ः पिंपळकौठा चोर व पांढरवाडी. हदगाव ः पिंगळी. 
हिमायतनगर ः चिंर्चोडी, सवना ज., एकघरी, वाघी व महादापूर. 
किनवट ः आंदबोरी इ., बोधडी बु., दहेगाव ची., गोंडेमहागाव, करंजी हुडी, कुपटी बु., लिंगी, मलकवाडी,
मदनापूर ची., मलकापूर खेर्डा. 
बिलोली ः खतगाव, रामतीर्थ, हुनगुंदा,
किनाळा, पोखर्णी, तोरणा, चिंचाळा, रामपूर थडी, हिप्परगा माळ, केसराळी.
नायगाव ः खैरगाव - होटाळा, टाकळी तब, नावंदी, रातोळी, शेळगाव छत्री,
मांडणी. 
देगलूर ः तुपशेळगाव. मुखेड ः शिरूर दबडे, कोटग्याळ,
आडलूर/नंदगाव, सांगवी भादेव, गोणेगाव, चव्हाणवाडी, आखरगा, हिप्परगा दे,
उंद्री पदे, सांगवी बेनक, चिवळी, बेरळी बुद्रुक, बेरळी खुर्द,
धनज/जामखेड, डोरनाळी, राजुरा तांडा, मेथी खपराळ, तग्याळ, मंडलापूर,
वर्ताळा, येवती, राजुरा बुद्रुक, मारजवाडी, इटग्याळ पदे. 
कंधार ः बाचोटी,
बोरी खुर्द, मरशिवणी, संगूची वाडी.
लोहा ः जोशी सांगवी, कामळज, जोमेगाव, बोरगाव आ., हळदव, चितळी, धानोरा म.,
कलंबर बुद्रुक, मुरंबी, गौडगाव.

येथे क्लिक करा - नांदेड विभागात चार लाख टन उसाचे गाळप, दोन लाख ६३ हजार क्विंटल साखरचे उत्पादन

मतदार याद्याही रद्द

राज्य निवडणूक आयोगाच्या ता. पाच फेब्रुवारी २०२० च्या आदेशान्वये
ग्रामपंचायत निवडणुकांसाठी तयार करण्यात आलेली मतदार यादीदेखील रद्द
करण्यात आली आहे. परिणामी आता या निवडणुकांसाठी मतदार यादी आणि प्रत्यक्ष
निवडणुकीचा कार्यक्रम नव्याने जाहीर केला जाणार आहे.
 

loading image