नांदेड : गतिरोधकावर वाहन धडकेत एक जण जागीच ठार

गतिरोधक आणि सूचना फलक नसल्यामुळे मोठा अपघात झाला
vehicle Accident
vehicle AccidentSakal

लोहा (जि. नांदेड) - लोहा शहरातून लातूरकडे जाणाऱ्या महादेव मंदिराजवळ लोहार समाजाची वस्ती आहे. अगदी रस्त्याला खेटून घरे असल्यामुळे रस्ता अरुंद झाला आहे. तीन टप्प्यांचा मोठा गतिरोधक असून या ठिकाणी कुठलाही सूचनाफलक नाही शिवाय रस्त्यात मोठमोठे दगड अंथरले आहेत. रविवारी (ता. 15) पहाटे साडे पाचच्या दरम्यान गतिरोधकावर  पाठीमागून येणाऱ्या वाहनाने समोरच्या वाहनाला धडक दिल्यामुळे एक जण जागीच ठार झाला तर दुसरा गंभीर जखमी आहे. रस्ते विकास बांधणी आणि देखभाल याकडे दुर्लक्ष केल्यामुळे अपघातात वाढ होत असल्याचे चित्र पाहायला मिळते आहे.

लोहा तालुक्यात आणि शहरापासून समृद्धी महामार्ग बांधणी होत आहे. मात्र या उभारणीमध्ये जागोजागी रस्त्यासाठी पर्यायी व्यवस्था दिली. त्यासाठी वाहनांना कुठल्याच प्रकारचे निर्देश सूचनाफलक नसल्यामुळे अपघातात वाढ होत आहे. कच्चा रस्ता तयार करत असताना रस्त्यावर धुऊ नये म्हणून पाण्याच्या टॅंकरने पाणी टाकले जाते त्याचा परिणाम गोल मोठ्या खड्ड्यात होतो आणि खड्डे वाहनांना अडथळा ठरत असल्यामुळे वाहन पदपथावरून नेण्यात येत आहे. अशातच कंधार रस्त्यावर टिप्परने धडक दिल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना ताजी असतानाच रविवारी (ता.15) शनिदेव मंदिराजवळ गतिरोधक आणि सूचना फलक नसल्यामुळे मोठा अपघात झाला. लातूरहून नांदेडच मालवाहू टेंपो क्र. (एम एच 40 बीएल 4965) गतिरोधक आवर येताच त्याला समोरच्या गाडीला पाठीमागून जोरात धडक बसली. टेंपोच्या वरच्या पाळण्यात झोपलेली व्यक्ती अपघातात दबून जागीच मरण पावली. अज्ञात वाहन पडून गेले. क्रेनचा साह्याने मृतदेह काढण्यात आला. यापूर्वीच कंधार रोडवर रस्त्याचे खड्डे पडल्यामुळे मॉर्निंग वॉकला जात असलेल्या तरुणाचा टिप्परने मृत्यू ओढवला. कारेगाव परिसरातील गुरुद्वारा जवळ ट्रॅक्टर आणि जड वाहनाची धडक बसून एकाचा मृत्यू झाला.

गौण खनिजाची उघड चोरी...

समृद्धी महामार्ग च्या नावाखाली पोलीस वाडी परिसर, मंगरूळ घाटातील डोंगर सुनेगाव तलावातील गौण खनिज अवैधरित्या उत्खनन करून दिवसाढवळ्या गौण खनिजाची चोरी केली जाते. यावर महसूल विभागाचा कुठलाही अंकुश नसल्याचे चित्र उघड झाले आहे दिवसाकाठी हजारावर गौणखनिज (मुरूम) फेऱ्या होत आहेत. या घटनेकडे पोलीस प्रशासन, बांधकाम रस्ते विकास बांधणी आणि संबंधित यंत्रणा यांचे कोणाचेच लक्ष नसल्यामुळे अपघातात दिवसोंदिवस वाढ होत असल्याच्या तक्रारी आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com