esakal | जिल्हाभरातून एक लाखाची हातभट्टी जप्त 
sakal

बोलून बातमी शोधा

फोटो

हातभट्टी, देशी, विदेशी आणी शिंदी या मद्याचा महापूर वाहत आहे. पोलिसांच्या जिल्हाभरातील रविवार (ता. तीन) केलेल्या कारवाईत एक लाखाचे मद्य जप्त करून अनेकांवर विविध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल .

जिल्हाभरातून एक लाखाची हातभट्टी जप्त 

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : परवानाधारक मद्याची दुकाने लॉकडाउनमुळे बंद असल्याने जिल्हाभरात अवैध मद्य विक्री करणारी टोळी सक्रीय झाली आहे. हातभट्टी, देशी, विदेशी आणी शिंदी या मद्याचा महापूर वाहत आहे. पोलिसांच्या जिल्हाभरातील रविवार (ता. तीन) केलेल्या कारवाईत एक लाखाचे मद्य जप्त करून अनेकांवर विविध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी जिल्हाभरात लॉकडाउन सुरू आहे. या दरम्यान नागरिकांनी अत्यावश्‍यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये अशा सक्त सुचना प्रशासनाने दिल्या आहेत. पोलिस व राज्य उत्पादन शुल्क विभाग बंदोबस्तात व्यस्त असल्याचे पाहून अवैध धंदेवाले आपले उखळ पांढरे करुन घेत आहेत. अवैध मार्गाने हातभट्टी व आरोग्याला अपायकारक अशी शिंदी पिणाऱ्यांच्या गळी उतरवीत आहेत. अवैध देशी, हातभट्टी व शिंदीची विनापरवाना विक्री करणाऱ्यांविरुद्ध धडक कारवाईची मोहीम राबविण्यात येत आहे. 

हेही वाचा -  आनंदवार्ता : कोट्याहून परतलेल्या विद्यार्थ्यांचा अहवाल निगेटीव्ह

जिल्हाभरातून दहाजणांवर गुन्हा दाखल

पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर आणि राज्य उत्पादन शुल्कचे जिल्हा अधीक्षक निलेश सांगडे यांच्या मार्गादर्शनाखाली जिल्हाभरात अवैध मार्गाने विकणाऱ्या देशी दारु, हातभट्टी, विदेशी आणि शिंदी दारु पकडण्यासाठी पथक तैणात करण्यात आले आहे. या पथकांमार्फत तामसा, उमरी, लोहा, नायगाव, कुंडलवाडी आणि नांदेड शहरात छापे टाकून तब्बल एक लाखाची दारु जप्त केली आहे. त्यात तामसा पोलिस ठाण्यांतर्गत ६० हजाराची हातभट्टी, उमरी २५ हजाराची हातभट्टी आणि अडीच हजाराची शिंदी, लोहामध्ये दीड हजाराची शिंदी, नायगावमध्ये तीन हजाराची विदेशी दारु, कुंडलवाडीमध्ये तीन हजार शिंदी आणि भाग्यनगर ठाण्याच्या हद्दीतून १३ हजाराची शिंदी असा एक लाखाचा दारुसाठा जप्त केला.

येथे क्लिक करालाॅकडाउन :  न्यायालयात आता वन स्टाॅप सेंटर
 
दारु पिणाऱ्यांचे मोर्चे ग्रामिण भागाकडे

नांदेड शहरात व जिल्ह्यात अधीकृत दारु विक्री करणारे दुकाने बंद असल्याने दारु पिणाऱ्यांचे मोर्चे आता ग्रामिण भागाकडे वळु लागले. चढ्या दराने मिलेल ती दारु पिण्यात धन्यता मानणारे तळीराम कोसोदूर पायी जाऊन आपली हौस भागवत असल्याचे दिसून येत आहे. मात्र त्यांना ग्रामिण परिसरातही दारु मिळु नये यासाठी पोलिस प्रशासन लक्ष ठेवून आहे. हातभट्टीचे व देशी दारुचे अड्डे उद्धवस्त करुन संबंधीतावर कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. एवढेच नाही तर सोमवारी (ता. चार) जिल्ह्याती अनेक तळीराम दारुसाठी लातूर जिल्ह्यात घुसखोरी करत असल्याचे सांगण्यात आले.