रात्री-बेरात्री अर्जाची ऑनलाइन नोंदणी

online.jpg
online.jpg

कंधार, (जि. नांदेड) ः तीन दिवसांच्या सुट्टीनंतर सोमवारी (ता.२८) अर्ज भरणाऱ्यांनी तहसील कार्यालयात एकच गर्दी केली. इंटरनेट सेवा विस्कळीत असतानाही २८६ अर्ज भरण्यात आले. आलेगाव ग्रामपंचायतची निवडणूक रद्द करण्यात आल्याने तालुक्यातील ९७ ग्रामपंचायतींच्या निवडणूका होत असून सर्वर बंद पडत असल्याने ऑनलाइन अर्ज भरताना उमेदवारांना मोठ्याप्रमाणात अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेष करून महिला उमेदवारांची मोठ्याप्रमाणात ससेहोलपट होताना दिसत आहे. 


तालुक्यात ९७ ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. गावागावात राजकीय वातावरण तापत आहे. मागच्या निवडणुकीत विरोधक असलेले गाव पुढारी कुठे एकत्र आल्याचे तर कोठे एकत्र असलेले पुढारी आता विरोधक झाल्याचे पहावयास मिळत आहे. राजकीय आखाड्यात दोन हात करण्यासाठी तरुण पिढी अधिक रस घेत असल्याचे चित्र आहे. काही ग्रामपंचायती बिनविरोध काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. आता पर्यंत पाच ग्रामपंचायती बिनविरोध काढण्यात आले आहेत. नामनिर्देशनपत्र दाखल करण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची जुळवा-जुळव करताना उमेदवारांची चांगलीच तारांबळ उडत असून सर्वर डाऊनमुळे उमेदवारांना रात्री जागरण करण्याची वेळ येत आहे. 


निवडणूक आयोगाने २३ ते ३० डिसेंबर असे एकूण आठ दिवस अर्ज भरण्यास दिले आहेत. मात्र, यातील तीन दिवस सलग सुट्या असल्याने वाया गेले. आता फक्त पाच दिवस अर्ज भरण्यासाठी असल्याने इच्छुकांचे टेंम्प्रेचर वाढले आहे. सोमवारचा दिवस सर्वर डाऊन राहिले. आता फक्त तीनच दिवस शिल्लक असून विविध नियमांची पुर्तता व कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी इच्छुक उमेदवारांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. 


नामनिर्देशनपत्र ऑनलाइन नोंदणी करताना सर्वर डाऊन होत आहे. यामुळे अनेकांना संगणकासमोर ताटकळत बसावे लागत आहे. दिवसा सर्वर डाऊन होत असल्याने रात्रीबेरात्री सेवा सुरळीत झाल्यावर अर्जाची ऑनलाइन नोंदणी केली जात असल्याचे केंद्र चालकाकडून सांगण्यात आले. त्यामुळे जागरण करून अर्ज भरले जात आहेत. ऑनलाईनमुळे उमेदवार मेटाकुटीला आले आहेत. गाव सोडून त्यांना शहरात दोन-दोन दिवस मुक्काम करावा लागत आहे. महिला उमेदवारांना याचा मोठा त्रास होत असून अर्ज भरण्यासाठी त्यांची उपस्थिती आवश्यक असल्याने त्यांना या बेजारीला सामोरे जावे लागत आहे. 

संपादन - स्वप्निल गायकवाड
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com