वेदनादायक : उपचाराला पैसे नसल्यामुळे तरुणीची आत्महत्या

एकनाथ तिडके
गुरुवार, 21 मे 2020

यामुळे माळाकोळी (ता. लोहा) येथील तरुणी वर्षाराणी भगवान केंद्रे हीने बुधवारी (ता. २०) रात्री साडेअकराच्या सुमारास घरातच गळफास लावुन आत्महत्या केली आहे.

माळाकोळी (जिल्हा नांदेड) : वडील मजुरी करुन घर चालवतात ...लाॅकडाऊनमुळे काम बंद ... किडणीचा आजार ... उपचारासाठी पैसे नाहीत ... वडीलांचे काम बंद असल्यामुळे खायचे वांधे ... घरात राशन नाही ... यामुळे माळाकोळी (ता. लोहा) येथील तरुणी वर्षाराणी भगवान केंद्रे हीने बुधवारी (ता. २०) रात्री साडेअकराच्या सुमारास घरातच गळफास लावुन आत्महत्या केली आहे.

वर्षाराणी ही मागील अनेक वर्षापासुन किडणी व लिव्हरच्या आजाराने त्रस्त होती. याच आजारामुळे तिचा घटस्फोटही झाला होता. वडील भगवान केंद्रे हे मजुरी करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात मात्र देशात कोरोनामुळे लाॅकडाऊन सुरु आहे. यामुळे वडील कामानिमीत्य पुणे येथे गेले असता मागील तीन महिण्यांपासुन तेथेच अडकुन पडले व ईकडे गावाकडे कुटुंबाची फरपट सुरु झाली. कसेबसे मागील दोन महिणे नातेवाईकांच्या मदतीने राशन मिळाले मात्र अलिकडे घरात राशन नसल्यामुळे उपासमार होत होती. तसेच उपचारासाठी, औषधासाठी पैसे नसल्यामुळे वर्षाराणीचा त्रास वाढला होता. यामुळे अलिकडे ती त्रस्त होती.

येथे क्लीक करानांदेडला कोरोनाचा धक्का अन् दिलासाही...

उपचाराला पैसे नसल्यामुळे तरुणीची आत्महत्या 

वर्षाराणी लग्न मोडल्यापासुन वडीलांकडेच राहत होती तिला औषधे सुरु होती. वडील पुणे येथे मजुरी करुन गावाकडे पैसे पाठवायचे त्यातच वर्षाचा औषध खर्च. घरखर्च काटकसरीने चालायचा मात्र लाॅकडाऊनमुळे कामही बंद व वडील पुण्यातच अडकले. यामुळे वर्षाचा त्रास वाढला घरात खायला अन्न नाही औषधे घ्यायला पैसे नाहीत. यामुळे त्रस्त असलेल्या वर्षाराणीने आत्महत्या करण्याचा टोकाचा निर्णय घेतला. ता. २० मे रोजी वर्षाराणीने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली.

लाॅकडाऊनचा बळी....

वडीलांची गरीबी त्यांना घर नाही, शेती नाही, मजुरांसाठी शासनानाकडुन लाॅकडाऊनमध्ये कुठलीही मदत मिळाली नाही. यामुळे अनेक मजुरी करुन गुजराण करणारी कुटुंब अडचणीत आली आहेत. अशा मजुर कुटुंबासाठी शासनाने लाॅकडाऊन काळात रोजगारहमीची कामे सुरु केली असती. व आर्थीक मदत केली असती तर कदाचीत हा बळी गेला नसता, अशीच चर्चा माळाकोळी येथे होत आहे. 

हेही वाचासौर कृषिपंप नादुरुस्त झाल्यास बदलून देणार- महावितरण

प्रहारकडून मदत 

प्रहार जनशक्ती पक्षाचे पुणे येथील सचीन ढवळे यांना घटना समजताच त्यांनी वर्षाराणीचे वडील भगवान केंद्रे यांना पुणे येथुन गावाकडे येण्यासाठी मदत केली. तातडीने प्रशासनाकडुन परवाणगी मिळवली व खाजगी वाहनाची व्यवस्था करुन त्यांना गावकडे पाठवले.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Painful: Suicide of a young woman due to lack of money for treatment nanded news