Parbhani: सख्ख्या भावाच्या खुनाबद्दल आरोपीस जन्मठेपेची शिक्षा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime

परभणी : सख्ख्या भावाच्या खुनाबद्दल आरोपीस जन्मठेपेची शिक्षा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

परभणी : सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीस येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने मंगळवारी (ता.२३) जन्मठेप व १५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. शेळ्या चारण्यावरून सायखेडा (ता. जिंतूर) येथील रामराव किशनराव जाधव याने सख्खा भाऊ शेषराव जाधव यास शिवीगाळ केली. त्याच दिवशी सायंकाळी शेषराव जाधव आईला जेवणासाठी बोलविण्यास जात असताना घरासमोरील रस्त्यावर रामराव जाधव याने शेषराववर कुऱ्हाडीने घाव घातला.

शेषराव जाधव याची मुलगी सुरेखा ही भांडण सोडविण्यासाठी गेली असता तिच्यावरही कुऱ्हाडीने घाव घातला. त्यानंतर रामराव जाधवने शेषरावच्या डोक्यात कुऱ्हाडीने घाव घातला. त्यात तो जागीच मरण पावला. शेषरावची पत्नी सावित्री जाधव यांनी चारठाणा पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल झाला होता. तपासाअंती पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. जिल्हा व सत्र न्यायाधीश ओंकार देशमुख यांनी आरोपी रामराव जाधव याला जन्मठेप व १५ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली.

हेही वाचा: दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं... “कॉसमॉस नावाचा निसर्गाचा शत्रू

सरकारी अभियोक्ता अॅड. ज्ञानोबा दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सरकारी वकील आनंद गिराम यांनी सरकार पक्षातर्फे बाजू मांडली. कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून फौजदार नागनाथ तुकडे, सहायक पोलिस उपनिरीक्षक सुरेश चव्हाण, शिवाजी भांगे, पोलिस शिपाई प्रमोद सूर्यवंशी यांनी काम पाहिले.

loading image
go to top