esakal | अर्धापूरातील सार्वजनिक ठिकाणे बनले तळीरामाचे अड्डे; ना पोलिसांचा धाक, ना नागरिकांची भिती
sakal

बोलून बातमी शोधा

अर्धापूर  तळीरांमाचे अड्डे

अर्धापूरातील सार्वजनिक ठिकाणे बनले तळीरामाचे अड्डे; ना पोलिसांचा धाक, ना नागरिकांची भिती

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

अर्धापूर ( जिल्हा नांदेड ) : शहरातील सार्वजनिक जीवनावर कोणाचा धाक राहिला नाही. कोणी कसेही वागावे, कुठेही दारु पिऊन अस्वच्छता करावी, मटक्याचे आकडे घ्यावेत अशा अप्रवृती फोफावल्या आहेत. पोलिस प्रशासनाचा कोणत्याही अवैध धंद्यावर वचक राहिला नाही. तसेच सामाजिक भिती न राहिल्याने गुन्हेगारी वृत्ती वाढत आहे.

अर्धापूर शहरातील नगरपंचायत ही महाराष्ट्रातील सुरुवातीला ज्या चार नगरपंचायत स्थापन केल्या, त्यातील एक महत्त्वपूर्ण नगरपंचायत आहे. नगरपंचायत स्थापन करण्यामागचा उद्देशच शहराचा वाढता आकार, वाढती लोकसंख्या व याबरोबर निर्माण होणारे प्रश्न सोडवण्यासाठी ग्रामपंचायतला आपला कार्यभार करणे अडचण जाते. अशा वेळेस स्थानिक स्वराज्य संस्थेतील शहरीकरणातील महत्त्वपूर्ण असणारी स्थानिक संस्था म्हणजे नगरपंचायत स्थापना केली जाते. जेणे करुन शहरातील प्रश्न मोठ्याप्रमाणात सोडवण्यात येतील व ग्रामपंचायतच्या तुलनेत नगरपंचायतला निधी थेट मोठ्या प्रमाणात मिळतो. जबाबदार अधिकारी व पदाधिकारी यांनी कार्य करुन शहराचा विकास केला पाहिजे ही अपेक्षा असते.

हेही वाचा - सेलू तालुक्यातील कसुरा नदीवर कोल्हापुरी बंधारे उभारण्याची गरज

नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री या भागाचे सक्षम नेतृत्व करणारे अशोक चव्हाण यांनी अर्धापूर शहराचा वाढत जाणारा आकार व विकासाची गरज पाहून, शहरासाठी नगरपंचायत स्थापन केली. येथील स्थानिक नेतृत्वाकडे या नगरपंचायतीचा कारभार आपल्या पक्षाच्या माध्यमातून त्यांनी सत्ता स्थापन करुन सुपूर्त केला.

येथील नगरपंचायतीचा दुसऱ्या टप्प्यातील कार्यकाल हा काँग्रेसच्याच नगरसेवकांकडे पुन्हा जनतेने दिला. म्हणजेच काँग्रेसच्या नगरसेवकांची सत्ता याठिकाणी स्थापन झाली. परंतु या नगरसेवकांनी जेवढा विकास खास शहराच्या बाबतीत लक्षात घ्यायला पाहिजे तेवढा घेतलेला दिसत नाही. याचे उदाहरण रस्त्यावर टाकली जाणारी घाण, कचरा, गल्लीतील अरुंद रस्ते, तळ्यात जमा होणारे नाल्याचे घाण पाणी ही प्रमुख उदारहरण आहेत. याच बरोबर आज एक समस्या दारुड्यांची निर्माण झाली आहे. ही समस्या प्रत्येक गल्लोगल्ली झालेली आहे.

अर्धापूर शहरातील तामसा रोड, पोलिस स्टेशन समोरील रोड, स्मशानभूमीच्या बाजूची रस्ते, तळ्यापासून ते पोलिस स्टेशनपासून येणारा मधला रस्ता याचबरोबर जिल्हा परिषद शाळा, एरिगेशन कॉलनीमधील क्रीडांगण, कॅनॉल रॉड, बायपास रोड अशी जे काही रिकामे स्थळ असतील अशा सर्व ठिकाणी दारुडे आपली बैठक बसऊन मद्यपान करताना दिसत आहे. यामध्ये रस्त्याने जाणारे- येणारे महिला- पुरुष व सामान्य माणूस यांची कुठलीही तमा न बाळगता हे मद्यपी दारु ढोसतात व गोधआळ घालतात. यामुळे महिलांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतो. विशेषतः तामसा रोड येथील बायपास त्या बायपासवर बसणारे दारुडे मोठ्या प्रमाणामध्ये चार वाजल्यापासूनच दारु पीत असताना दिसून येतात.

येथे क्लिक करा - नांदेडातील अर्धापूरच्या मलाईदार ठाण्यासाठी अनेकजण उत्सुक

शहरातील परिस्थिती सुधारण्यासाठी विरोधी पक्षनेते व जागरुक नागरिकांची सुद्धा गरज आहे. बसस्टँड परिसरात कोंबडे विक्रेते मोठ्या प्रमाणात परिसर घाण करतांना दिसतात, कोंबडे विक्रेते त्या कोंबड्याची छाटले पंख हे रस्त्याला टाकून देतात, मॉर्निंग वॅाकला जाणाऱ्या लोकांना शुद्ध ऑक्सिजन ऐवजी नाकाला दस्ती लावून रस्त्याने फिरावे लागते ही एक लाजिरवाणी बाब आहे.

एक प्रकारे ही सुद्धा घाण रस्त्यावर करण्याचे काम येथील कोंबडी विक्रेते करताना दिसतात. त्याला खऱ्या अर्थाने जबाबदार स्थानिक प्रशासन आहे असेच म्हणावे लागेल. मोठं नेतृत्व हे वरील पातळीवर कार्य करत असते. खालील स्थानिक पातळीवर स्थानिक नेतृत्वाने लक्ष देणे गरजेचे आहे. कोणते बातमीमध्ये उगीचच पालकमंत्र्याचे नाव टाकून पालकमंत्र्यांच्या मतदारसंघांमध्ये अमुक- अमुक अशा प्रकारचे कार्य चुकीचं ठरतं अस आम्हाला वाटते. कारण पालकमंत्री संपूर्ण जिल्ह्याचा कारभार पाहतात महाराष्ट्राचा कारभार पाहत असतात त्यांना स्थानिक पातळीवर नेतृत्व आणि योग्य ती साथ देणे आवश्यक आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे