esakal | देगलूरातील चारशे एकरमध्ये  बहरतेाय पेरु, सीताफळ
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने भेटीत दिले  जिल्हाधिकाऱ्यांना शेत भेटीचे निमंत्रण...!! 

देगलूरातील चारशे एकरमध्ये  बहरतेाय पेरु, सीताफळ

sakal_logo
By
अनिल पाटील

देगलूर (जिल्हा नांदेड) : तालुक्यातील 22 गावातील प्रयोगशील शेतकऱ्यांनी 400 एकरवर पेरु व सीताफळाची लागवड शासनाच्या विविध योजनेतील घेतली. तालुक्यातील रामपूर, माळेगाव येथील पेरू गत दोन वर्षापासून परराज्यातही जात असल्याने येथील शेतकऱ्यांना उत्पन्नाचा नवा मार्ग सापडून त्यांच्या जीवनात नवी आर्थिक क्रांती निर्माण होण्याची आशा बळावत चालली आहे. 


बुधवार (ता. 11) रोजी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन विटणकर यांची भेट घेऊन त्यांना शेतीत भेटीचे निमंत्रण दिले. डॉक्टर विपिन यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधताना उत्पादित केलेला पेरु चांगल्या दर्जाचा असून येणाऱ्या काळात शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी येईल असा आशावाद व्यक्त करुन भेटीचे निमंत्रण स्वीकारले. 

तालुक्यातील खानापूर, रामपूर, माळेगाव, सुगाव, लखा, कुशावाडी, काठेवाडी, तमलूर, लोणी, करडखेड, होटल, आमदापुर, भोकसखेडा, देगलूर शहापुर, माळेगाव क्षिरसमुद्र, निपाणी सावरगाव, अपसावरगाव, मनसकरगा, इब्राहिमपूर या गावासह इतर गावात शासनाच्या कै. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोखरा ) महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत जवळपास चारशे एकरवर  पेरु व सीताफळ लागवडीचा कार्यक्रम हाती घेतला असून काही गावात गेल्या दोन वर्षापासून उत्पादनालाही सुरुवात झाली आहे. 

हेही वाचा -  नांदेड- ​बायपास सर्जरी विभाग सुरु करण्यासाठी अधिष्ठाता प्रयत्नशील, मोडुलर प्लॉन लवकरच प्रत्यक्षात येण्याची शक्यता

तालुक्यालगत असलेल्या तेलंगणा, आंध्र, कर्नाटक व स्थानिक बाजारपेठेत या मालाला चांगली मागणी असल्याने व उत्पादीत माल चांगल्या दर्जाचा असल्याने शेतकऱ्यांच्या जीवनात येत्या काळात नवी आर्थिक क्रांती निर्माण होऊ शकते. त्यामुळे नव तरुणांनी प्रयोगशील शेतीकडे वळण्याचे आवाहन श्री अनिल इंगोले पाटील यांनी केले आहे. 

बुधवार (ता. ११) रोजी जिल्हा कृषी अधीक्षक रविशंकर चलवदे, जि. प. चे कृषी अधिकारी संतोष नाद्रे, उपविभागीय कृषी अधिकारी महादेव सोनटक्के,तालुका कृषी अधिकारी शिवाजी शिंदे यांच्यासह शेतकरी अनिल पाटील हिंगोले (रामपूर), गजानन बामणे (मनसकरगा ), राजेंद्र शिंवणे (वन्नाळी) यांनी जिल्हाधिकारी डॉ. विपीन ईटणकर यांची भेट घेऊन त्यांना शेतात उत्पादित केलेला पेरु दाखवला. मालाचा दर्जा पाहून जिल्हाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले. 

संपादन- प्रल्हाद कांबळे