file photo
file photo

होणाऱ्या जावयामुळे नांदेडच्या पोलिस कॉलनीला हादरा

नांदेड : शहर व जिल्ह्यात कोरोनाने आपले पाय पसरले आहेत. प्रशासनाकडून या आजाराचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न सुरू असतानाच बुधवारी (ता. २०) रात्री चार जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यात स्नेहनगर पोलिस वसाहतीत राहणाऱ्या एका महिला पोलिसाच्या होणाऱ्या जावयाचा समावेश आहे. हा अहवाल येताच पोलिस दलात खळबळ उडाली असून पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक दत्ताराम राठोड, विजय पवार, उपविभागीय पोलिस अधिकारी (शहर) अभिजीत फस्के, महापालिका उपायुक्त यांनी भेट देऊन सुरक्षीत राहण्याच्या सुचना दिल्या. 

मुंबई येथून आलेल्या जावयामुळे स्नेहनगर पोलिस वसाहतीला जबर धक्का बसला असून वसाहतीचा काही भाग कन्टेनमेन्ट झोन केला आहे. या परिसरातील सर्व पोलिस व त्यांच्या कुटुंबियांची तपासणी सुरू करण्यात आली आहे. हा परिसर सॅनिटायझर करून स्वच्छ करण्यात आला असून होणाऱ्या जावयाच्या सासरवाडीतील चार जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.

थेट मुंबईहून नांदेड

ता. १३ मे रोजी जावईबुवा हे थेट मुंबईहून आपल्या सासरवाडीत आला. परंतु त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केले. दरम्यानच्या काळात तो चार ते पाच दिवस पोलिस वसाहतीतील आपल्या सासरवाडीत होता. या दरम्यान त्याचा अनेकांशी संपर्क आला असल्याने या परिसरातील सर्व नगरिकांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. 
 
जिल्ह्याची कोरोनाबाधीत संख्या ही ११० वर पोहचली

नांदेड जिल्ह्याची कोरोनाबाधीत संख्या ही ११० वर पोहचली आहे. कोरोनाने आपले हातपाय शहराच्या विविध भागात पसरत ग्रामिणमध्येही शिरकाव केला आहे. सध्या शहरात कोरोना बाधीतांची संख्या वाढत असल्याने जिल्हा प्रशासन, पोलिस आणि महापालिका प्रशासन हतबल झाल्याचे पहावयास मिळत आहे. एखाद्या कोरोना संशयीत रुग्णाचा अहवाल हा वेळेत येत नसल्याने त्याचा अनेकांशी संपर्क येत असल्याचे दिसून येत आहे. लंगरसाहीब गुरूद्वारातील दोन पॉझिटिव्ह आलेले रुग्ण अद्याप प्रशासनाला शोधून काढता आले नाही.

हॉटस्पॉटमधून आलेल्यांमुळे शहराला धोका

पुणे, मुंबई या हॉटस्पॉट शहरातून आलेल्या नागरिकांना बाहेरच क्वारंटाईन करून शहरातील रुग्णांची संख्या वाढणार नाही याची प्रशासन काळजी घेत आहे. मात्र काहीजण लपून छपून आपल्या नातेवाईकांमध्ये थेट संपर्क करत आहेत. अशांना शोधून काढणे अवघड होत असून ज्यांच्या घरी पाहूणा किंवा नातेवाईक आल्यास प्रशासनाला कळविण्याची जबाबदारी त्या सुज्ञ नागरिकांची आहे. मात्र ते सध्या दिसून येत नाही. 

कोरोनाला हरविण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे

बुधवारी (ता. २०) १४ अहवालापैकी चार जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यात एक पोलिस वसाहत, सांगवी, दोन करबला येथील रुग्णाचा समावेश आहे. शहरातील कन्टेनमेन्ट झोनची संख्या वाढत आहे. लॉकडाउनचे नियम पाळून कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी केले आहे. वसाहतीत सर्वत्र स्वच्छता करण्यात येत असून वसाहतीत आलेल्या नविन व्यक्तीची कसुन तपासणी करण्यात येत असल्याचे कॉलनी इन्चार्ज उद्धव घुले यांनी सांगितले.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com