esakal | मृत पोलिसाच्या कुटुंबीयांना मिळाला मोठा आधार, ६० लाखांची मदत
sakal

बोलून बातमी शोधा

नांदेड : कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या पोलिस अंमलदार किरण तेलंगे यांच्या कुटुंबियांना ६० लाख रुपयांचा धनादेश पोलिस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांच्या हस्ते शुक्रवारी देण्यात आला.

मृत पोलिसाच्या कुटुंबीयांना मिळाला मोठा आधार, ६० लाखांची मदत

sakal_logo
By
अभय कुळकजाईकर

नांदेड : कोरोना संसर्गामुळे Corona Infection मृत्यू पावलेल्या पोलिस अंमलदार किरण तेलंगे यांच्या कुटुंबियांना सानुग्रह अनुदान म्हणून साठ लाख रुपयांचा धनादेश पोलिस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे Police Superitendent Pramodkumar Shewale यांच्या हस्ते शुक्रवारी (ता.नऊ) देण्यात आला. मुदखेड येथे कर्तव्यावर असताना पोलिस जमादार किरण इरबाजी तेलंगे यांना कोरोनाचा संसर्ग झाला. उपचार सुरू असताना त्यांचा ता.२० डिसेंबर २०२० रोजी मृत्यू झाला. त्यामुळे या कोरोना योद्धाचा Nanded अहवाल पोलिस महासंचालक यांच्याकडे पाठविण्यात आला होता. त्यानुसार त्यांना नुकसान भरपाई म्हणून सानुग्रह अनुदान मंजुर झाले आहे. त्यांचे कायदेशीर वारसदार पत्नी मनिषा यांना २० लाख रुपये, मुलगा ऋतूप्रभात यांना वीस आणि दुसरा मुलगा कृष्णकांत यांना २० लाख रुपये असे एकूण ६० लाख रुपयांचा धनादेश पोलिस अधीक्षक शेवाळे यांच्या हस्ते देण्यात आला आहे.police man family get 60 lakh aid who died due to corona in nanded

हेही वाचा: रेल्वे मंत्रालयाचे कामकाज सोळा तास चालणार : रावसाहेब दानवे

पोलिस जमादार तेलंगे यांनी २६ वर्षे विविध पोलिस ठाण्यात अविरत सेवा बजावली. तसेच जीवाची पर्वा न करता त्यांनी धाडसाने त्यांचे कर्तव्य चोखपणे बजावल्यामुळे अशा कोरोना योद्ध्याच्या कुटुंबियांना शासनाकडून प्राप्त झालेल्या निधीचा धनादेश देऊन सन्मान करण्यात आला. तेलंगे यांच्या कुटुंबियांची आस्थेवाईकपणे विचारपूस करून अडीअडचणीला मदत करण्याचे अभिवचन यावेळी देण्यात आले. यावेळी पोलिस कल्याणचे सहायक पोलिस निरीक्षक शिवप्रकाश मुळे, जनसंपर्क अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक शिवाजी लष्करे, कनिष्ठ लिपिक श्री. चौधरी आदी उपस्थित होते.

loading image