पोलिसांनो आरोग्याची काळजी घ्या- मनोज लोहिया

प्रल्हाद कांबळे
बुधवार, 27 मे 2020

आपण निरोगी राहिलात तर समाजाच्या सुरक्षेसाठी तत्पर राहता येते. यासाठी आपल्या आरोग्याची काळजी घ्या असा सल्ला नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक मनोज लोहिया यांना दिला. 

नांदेड : कर्तव्य कठोर खात्यात काम करतांना पोलिसाला सर्वच आघाड्यावर लढावे लागते. त्यासाठी पोलिसांनी आपले आरोग्य तंदुरुस्त राहील याकडे लक्ष ठेवावे. आपण निरोगी राहिलात तर समाजाच्या सुरक्षेसाठी तत्पर राहता येते. यासाठी आपल्या आरोग्याची काळजी घ्या असा सल्ला नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक मनोज लोहिया यांना दिला. 

कोरोनाचा जिल्ह्यात वाढता प्रसार लक्षात घेता पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी खबरदारी म्हणून पोलिस मुख्यालय मैदानावर शंभर खाटाचे तीन विलगीकरण कक्ष खास पोलिसांसाठी तयार केले. या विलगीकरण कक्षाचे उद्घाटन मंगळवारी (ता. २६) रात्री आठ वाजता श्री लोहिया यांच्या हस्ते करण्यात आले. 

हेही वाचा -  ‘ही’ बँक थेट शेतकऱ्यांच्या बांधावर, शेतकरी आनंदात

यांची होती प्रमुख उपस्थिती

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विपीन, महापालिका आयुक्त डॉ. सुनिल लहाने, अतिरिक्त पोलिस अधीक्षक विजय पवार, दत्ताराम राठोड, उपाधीक्षक डॉ. सिद्धेश्‍वर धुमाळ, अभिजीत फस्के, धनंजय पाटील, पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर, संजय ननवरे, साहेबराव नरवाडे, प्रशांत देशपांडे, संदिप शिवले, अनंत नरुटे, अभिमन्यु सोळंके यांची उपस्थिती होती. 

पोलिसांनी कुटुंबासोबतच आरोग्याची काळजी घ्यावी

पुढे बोलताना श्री. लोहिया म्हणाले की, पोलिसांनी आपल्या कुटुंबासोबतच आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. आपण सक्षम व तंदुरुस्त राहिलो तरच समाजातील प्रत्येक आघाडीवर लढण्याची शक्ती राहील. विसलगीकरण कक्ष उघडण्यात आला आहे मात्र यात माझा एकही पोलिस येता कामा नये. त्यासाठी खबरदारी घ्या, तोंडाला मास्क व हातात ग्लोज वापरून स्वच:ची काळजी घ्या. आपण सुदृढ असायलाच पाहिजे. तरच आपणास समाजाची सेवा करण्याची संधी मिळते. पोलिस दलात येण्याचे हेच महत्वाचे कारण असून समाजाचे संरक्षण करणे आपले कर्तव्य असल्याचे श्री. लोहिया यांना सांगितले. 

विनामास्क पोलिस कर्तव्यावर नको

जिल्हाधिकारी डॉ. विपीन म्हणाले की, पोलिस व आरोग्य आणि स्वच्छता विभागातील कर्मचारी खऱ्या अर्थाने कोरोनाची लढाई लढत आहेत. येणाऱ्या काळात विनामास्क पोलिस कर्तव्यावर दिसेल तर त्याच्याविरुद्ध कारवाई करण्यात येईल. आपण सुरक्षित तर समाज सुरक्षीत यासाठी स्वत: ची काळजी घ्या. सकस आहार घेऊन शरिराची प्रतिकार शक्ती वाढवा असा सल्ला डॉ. विपीन यांनी दिला. 

येथे क्लिक करा -  नांदेड जिल्ह्यात दोन खूनाच्या घटनांनी खळबळ, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न

१०० खाटांचे तीन विलगीकरण कक्ष

प्रास्ताविकात पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी सांगितले की, तयार करण्यात आलेले तीन विलगीकरण कक्ष पोलिसांसाठी आहेत. भविष्यात कोरोनाची लागन झाल्यास खबरदारी म्हणून ही पाउले उचलली आहेत. मात्र यात माझा एकही पोलिस येणार नाही याची दक्षता घेत आहे. नंदीग्राम एक, नंदीग्राम दोन आणि एक कक्ष महिला पोलिसांसाठी आहे. यात पुस्तके, टीव्ही, वायफाय आदी सुविधा देण्यात आल्या आहेत. चुकून एखादा पोलिस कोरोना बाधीत झाला तर त्याला घरचे जेवन देण्यात येईल. आपण घरीच असल्याचे त्याला वाटले पाहिजे असे कक्ष तयार करण्यात आले आहे. शेवटी विजय पवार यांनी आभार व्यक्त करत सिद्धेश्‍वर धुमाळ यांनी सुत्रसंचलन केले.  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police take care of health Manoj Lohia nanded news