‘ही’ बँक थेट शेतकऱ्यांच्या बांधावर, शेतकरी आनंदात

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 27 May 2020

हे पैसे त्यांच्या बांधावर जाऊन बळीराजाचा सन्मान पोस्ट बँकेनी केला आहे. अनेक वर्षाचे जय जवान जय किसान यांचे स्वप्न पूर्ण इंडिया पोस्ट पेमेंट बँक यांनी केले आहे.

नांदेड : पोस्ट बँकेच्या पोस्टमन यांनी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी अनुदान सरकारमार्फत जमा करण्यात आले आहे. हे पैसे त्यांच्या बांधावर जाऊन बळीराजाचा सन्मान पोस्ट बँकेनी केला आहे. अनेक वर्षाचे जय जवान जय किसान यांचे स्वप्न पूर्ण इंडिया पोस्ट पेमेंट बँक यांनी केले आहे.

ही देशातील पहिली बँक आहे की पोस्टमन थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकरी सन्मान निधी अनुदान पोस्ट बॅंकेचा Aeps प्रणाली द्वारे वाटप करत आहे. पोस्ट बँक थेट शेतकऱ्यांना बांधावर जाऊन शेतकऱ्याचा सन्मान करून शेतकऱ्यांना किसान सन्मान निधी पैसे देणारी पहिली बँक ठरली आहे. भारत हा शेती प्रधान देश आहे. शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे.

हेही वाचा नांदेड जिल्ह्यात दोन खूनाच्या घटनांनी खळबळ, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न

कुठल्याही बँक खात्यातील रक्कम काढता येते

शेतकऱ्यांना सन्मानाने 'बळीराजा' म्हंटले जाते. परंतु प्रत्यक्षात हा राजा अतिशय दिनदुबळा झाल्यामुळे  पोस्टमन विविध योजणांचे अनुदान वाड्या- तांड्यात, ग्रामीण भागातील शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन कोणत्याही बँकेतील (स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब बँक, आयसीआयसीआय, बडोदा बँक, देना बँक, युनियन बँक, एचडीएफसी,व ईतर बँक) च्या खात्यातील पैसे पोस्ट बँकेच्या Aeps प्रणाली द्वारे वाटप करत आहेत.

पेरणीपूर्व मशागतीचे काम पूर्ण 

अगोदरच बळीराजा चिंताग्रस्त झाला आहे. त्यांच्या समोरील आव्हान कायम आहे. मात्र या हंगामात आपणास निसर्ग साथ देईल या आशेवर तो पुन्हा कंबर कसुन शेतीमध्ये पेरणीपूर्व मशागतीला लागला आहे. कापूस, तूर, उडीद, सोयाबीन, ज्वारी, हळद यासाठी शेतीचे मशागतीचे काम पूर्ण केले आहे. आता फक्त चांगल्या पावसाच्या प्रतिक्षेत असून लवकरच पेरणी होईल अशी अपेक्षा व्यक्त करत आहे. 

येथे क्लिक करानांदेडकरांना आता मिळणार तीन दिवसांआड पाणी
 
बँकेत शेतकऱ्यांनी गर्दी करु नये
 
शेतकऱ्यांना पेरणीच्या काळात आलेले शेतकऱ्यांचे सर्व अनुदान, बियाणे, खते, कीटकनाशके औषधी घेण्यासाठी शेतकऱ्यांना बांधावर बँकेतील पैसे काढून देण्याची व्यवस्था पोस्ट बँकेनी केली आहे. शेतकऱ्यांनी बँकेत गर्दी करू नये असे आवाहन डाक अधीक्षक शिवशंकर लिंगायत यांनी केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: This bank is directly on the farmers' side, the farmers are happy nanded news