डाक विभाग : ‘माझी मुलगी, माझी जबाबदारी’ योजनेची सुरुवात

प्रल्हाद कांबळे
Friday, 2 October 2020

‘माझी मुलगी, माझी जबाबदारी ’ या मोहिमेअंतर्गत घरोघरी जाऊन शुन्य ते दहा वर्षापर्यंतच्या मुलीच्या आई व वडिलांना भेटून सुकन्या समृद्धी खाते योजनाचे खाते उघडण्यात येणार

नांदेड : किनवट तालुक्यातील गावा- गावात व घरोघरी जाऊन ही मोहीम राबविण्यात येणार आहे. ‘माझी मुलगी, माझी जबाबदारी ’ या मोहिमेअंतर्गत घरोघरी जाऊन शुन्य ते दहा वर्षापर्यंतच्या मुलीच्या आई व वडिलांना भेटून सुकन्या समृद्धी खाते योजनाचे खाते उघडण्यात येणार असल्याचे डाक निरीक्षक व विपणन कार्यकारी अधिकारी मुख्य पोस्ट ऑफिस यांनी सांगितले आहे.

डाक विभागा मार्फत ही योजना सुरु होऊन जवळपास सहा वर्षे झाली आहे. ग्रामीण व आदिवासी भागात सुकन्या समृद्धी खाते योजनेचा प्रसार व प्रचार करण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक गावात व वाड्या- तांड्यातील अंगणवाडी शाळेत जाऊन हजेरी पटाप्रमाणे शुन्य ते दहा वर्षापर्यंतच्या मुलींची यादी व वडिलांचे फोन नंबर घेऊन प्रत्येक मुलींच्या घरी जाऊन ‘ माझी मुलगी, माझी जबाबदारी ’ या मोहिमेत सहभागी करून मुलीच्या नावे सुकन्या समृद्धी खाते उघडून घरपोच देणार आहेत. 

हेही वाचाशेतकऱ्यांवर तिहेरी संकट : राज्यातील २१ जिल्ह्यात लंपी स्किन आजाराची व्याप्ती -

दोनशे पन्नास रुपये भरून खाते उघडता येते
 

सुकन्या समृद्धी खाते हे मुलीचे उच्च शिक्षण व विविध स्पर्धा परिक्षेचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी मोठी मदत मिळणार आहे. तसेच लग्नासाठी या सुकन्या समृद्धी खाते योजनेतून मोठी रक्कम मिळणार आहे. हे खाते दोनशे पन्नास रुपये भरून उघडून देण्यात येईल. त्या नतंरची रक्कम शंभर रुपयांच्या पटीत भरता येते. या योजनेत खाते उघडल्यापासून पंधरा वर्षे रक्कम भरणा करणे आवश्यक आहे. खाते उघडल्यापासून एकवीस वर्षाला मुदत पूर्ण होते.

येथे क्लिक करा - विद्यार्थ्यांसाठी गुड न्यूज : वनविभागाकडून वन्यजीव छायाचित्र स्पर्धा

मुलींचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सुकन्या समृद्धी खाते योजनेचा लाभ 

मुलीच्या वयाच्या आठरा वर्ष पूर्ण झाल्याने शिक्षणासाठी ५०% रक्कम व्याजासहित मुलीला उचण्याचा अधिकार आहे.
जमा केलेल्या रक्कमेवर एकवीस वर्ष चक्रवाढ व्याज दिले जाते. ग्रामीण भागातील व आदिवासी भागातील नागरिकांनी आपल्या मुलींचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सुकन्या समृद्धी खाते योजनेचा लाभ ‘माझी मुलगी, माझी जबाबदारी’ मोहिमेत घ्यावा.
असे आवाहन डाक विभागाचे विपणन कार्यकारी अधिकारी सुरेश सिंगेवार यांनी सांगितले आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Postal Department: Launch of 'My Daughter, My Responsibility' scheme nanded news