esakal | शासनाने शेतकऱ्यांना सरसकट मदत करावी, खासदार चिखलीकरांची मागणी
sakal

बोलून बातमी शोधा

खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी अर्धापूर तालुक्यातील अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतीच्या नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला.

शासनाने शेतकऱ्यांना सरसकट मदत करावी, खासदार चिखलीकरांची मागणी

sakal_logo
By
लक्ष्मीकांत मुळे

अर्धापूर (जि.नांदेड) : जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे (Rain) खरिपाच्या खूप मोठे नुकसान झाले आहे. राज्य शासनाने पंचनामे न करता शेतकऱ्यांना तातडीने मदत देवून दिलासा देण्यात यावा, अशी मागणी खासदार प्रताप पाटील चिखलीकर (Pratap Patil Chikhalikar) यांनी शनिवारी (ता.११) केली. अर्धापूर तालुक्यातील अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतीच्या नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. तालुक्यात मुसळधार पावसामुळे शेतीचे खुप मोठे नुकसान झाले असून शेतकरी (Nanded) हवालदिल झाला आहे. प्रशासन सध्या नदीच्या काठावर असलेल्या शेतीच्या नुकसानीची पाहणी करत आहे. अतिवृष्टीने खरिपाच्या पिकांना खूप मोठा फटाका बसला आहे. त्याचा परिणाम उत्पादनावर परिणाम होऊन शेतकऱ्यांना आर्थिक फटाका बसणार आहे. त्यामुळे पंचनामे न करता सरसकट मदत करावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

हेही वाचा: Aurangabad Crime : पैठणमध्ये शेतात तरुण शेतमजुराचा खून

श्री.चिखलीकर यांनी अर्धापूर तालुक्यातील शैलगाव,. सांगवी, मे़ढला , खडकी कोंढा, सावरगाव,देळुब आदी गावांना भेटी देऊन झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी धर्मराज देशमुख, महानगर अध्यक्ष प्रवीण साले, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष किशोर देशमुख, बाबुराव हेंद्रे, निलेश देशमुख, तालुकाध्यक्ष बालाजी स्वामी, अवधूत कदम, सुधाकर कदम, सखाराम क्षीरसागर, नागोराव भांगे, अमोल कपाटे ,जठन मुळे, संतोष पवार, तुळशीराम बंडाळे, नायब तहसिलदार मारोतराव जगताप, तालुका कृषी अधिकारी अनिल शिरफुले, म़ंडळ अधिकारी संजय खील्लारे, शेख शफियोदिन, संजय चतरमल, एस.पी.गोखले, विश्वनाथ मु़डकर आदी उपस्थित होते.

loading image
go to top