अर्धापुरात पंतप्रधान आवास योजनेचा बोजवारा, 418 लाभार्थ्यांचे सव्वाचार कोटी थकल्याने लाभार्थी अडचणीत

लक्ष्मीकांत मुळे
Monday, 28 December 2020

त्रस्त लाभार्थी नगरपंचायतीवर मोर्चा काढण्याच्या तयारीत आहेत. पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी लक्ष घालून आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी होत आहे. चौथा  हप्ता थकल्याने काही बांधकाम अर्धवट अवस्थेत आहेत. बांधकाम पुर्ण केलेले व अर्धवट बांधकाम केलेले अडचणीत सापडले आहेत. लाभार्थी चौथ्या हप्त्यासाठी नगरपंचायतीकडे चकरा मारीत आहेत. तर देणेकरी लाभार्थ्यांकडे चकरा मारीत आहेत.

अर्धापूर ( जिल्हा नांदेड ) : पंतप्रधान आवास योजनेतून नांदेड जिल्ह्यात सर्वात जास्त घरकुलांना अर्धापूर शहरात मंजूर मिळाली आहे. शहरात मंजूर झालेल्या दिड हजार घरकुलांपैकी बांधकाम केलेल्या 418 लाभार्थ्यांचे सव्वाचार कोटी थकले आहेत. चौथा हप्ता मिळाला नसल्याने लाभार्थी अर्थिक अडचणीत आले आहेत. उधार- उसनवारी करुन बांधकाम केलेल्या लाभार्थ्यांना देणेकरी तगादा लावत आहेत. लाभार्थी चौथ्या हप्तासाठी नगरपंचायतीकडे चकरा मारीत आहेत.

त्रस्त लाभार्थी नगरपंचायतीवर मोर्चा काढण्याच्या तयारीत आहेत. पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी लक्ष घालून आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी होत आहे. चौथा  हप्ता थकल्याने काही बांधकाम अर्धवट अवस्थेत आहेत. बांधकाम पुर्ण केलेले व अर्धवट बांधकाम केलेले अडचणीत सापडले आहेत. लाभार्थी चौथ्या हप्त्यासाठी नगरपंचायतीकडे चकरा मारीत आहेत. तर देणेकरी लाभार्थ्यांकडे चकरा मारीत आहेत.

हेही वाचानांदेड तहसिलच्या पथकाची वाळू घाटावर कारवाई, २४५ तराफे केले नष्ट -

राज्य शासनाने दिलेले सुमारे 14 कोटी अद्याप खर्च न झाल्याने केंद्र शासनाच्या हिश्शातील सुमारे साडेबावीस कोटी थकले आहेत. केंद्र व राज्य शासनाच्या नियमावलीत लाभार्थी भरडला जात आहे. या आडचणीत सापडलेले लाभार्थ्यांना स्थानिक लोकप्रतिनीथी लक्ष देण्याची गरज आहे.

अर्धापूर शहरात पंतप्रधान आवास योजना राबविण्यात येत आहे. या योजनाचे दोन टप्पे मंजूर झाले आहेत. पहिल्या टप्प्यात 714 व दुस-या टप्प्यात 784 असे मिळून सुमारे दिडहजार घरकुलांना मंजुरी मिळाली आहे. या मंजूर झालेल्या घरकुलांपैकी 503 घरकुलांचे बांधकाम प्रत्यक्षात सुरु झाले आहे. या योजनेत 325 चौरस फुट बांधकाम करण्यात येते.

शहरातील लाभार्थ्यांनी उत्साहात बांधकामास सुरूवात केली. या योजनेत प्रतिघरकुलास आडीच लाख शासनाकडून निधी  मिळतो. यात राज्य शासनाचा एक लाखांचा तर केंद्र शासनानाचा दिड लाखांचा वाटा असतो. शहरात दिड हजार घरकुलांना मंजुरी मिळाल्यावर राज्य शासनाच्या वाट्याचे सुमारे 14 कोटीचा निधी नगरपंचायतीला प्राप्त झाला आहे. या प्राप्त झालेल्या निधीतून लाभार्थ्यांना सुमारे सहा कोटी लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले आहेत. शहरात सुरु असलेल्या 503 बांधकामपैकी 418 लाभार्थ्यांना तिसरा हप्ता देण्यात आला असून त्यांच्या बॅंक खात्यावर सुमारे एक लाख 60 हजार जमा झाले आहेत. तर एक लाखांचा चौथा हप्ता बाकी आहे. शहरातील लाभार्थ्यांचे सुमारे सव्वाचार कोटी थकल्याने लाभार्थ्यांना आनेक अडचणीला सामोरे जावे लागत आहेत.

मला पंतप्रधान आवास योजनेतून घरकुल मिळाले आहे. घरकुलाचे बांधकाम करण्यासाठी उधार उसनवारी करावी लागत आहे. तसेच योजनेची पुर्ण रक्कम न मिळाल्याने मला बांधकाम अर्धवट ठेवण्याची वेळ आली आहे.
- दिलीप सरोदे यांनी दिली.

घरकुल बांधण्यासाठी मी उसने पैसे आणले आहे. बांधकामपूर्ण झाल्याचा आनंद असलात तरी देणेकरी घरची चकरा मारत आहेत. तर चौथा हप्ता मिळावा यासाठी आम्ही नगरपंचायतीकडे चकरा मारुन थकलो आहोत. तातडीने चौथा हप्ता देण्यात यावी आशी मागणी केली आहे. 
- सुर्यभान बाभूळकर

 

संपादन - प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Prime Minister's Housing Scheme in Ardhapur, 418 beneficiaries are in dire straits nanded news