Nanded News : मालमत्ताधारकांनी राहावे सावध ; फसवणुकीचे प्रकार वाढले

मागील दीड दोन वर्षात जमिनीला सोन्याचा भाव आला आहे. त्यामुळे मोक्याच्या जागा, भूखंडावर डोळा ठेऊन तो हडप करण्याचे किंवा फसवणूक करून ताब्यात घेण्याचे प्रकार वाढले आहेत.
nanded
nandedsakal

नांदेड : मागील दीड दोन वर्षात जमिनीला सोन्याचा भाव आला आहे. त्यामुळे मोक्याच्या जागा, भूखंडावर डोळा ठेऊन तो हडप करण्याचे किंवा फसवणूक करून ताब्यात घेण्याचे प्रकार वाढले आहेत. या संदर्भात काही ठिकाणी पोलिस ठाण्यात गुन्हेही दाखल होत आहेत. विशेष म्हणजे याकडे आजी माजी लोकप्रतिनिधींचेही दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे मालमत्ताधारकांनी सावध राहून लक्ष देण्याची गरज आहे.

कोरोना संसर्गाच्या नंतर नांदेड शहरातील फ्लॅट, प्लॉट, रो हाऊस तसेच रिकाम्या भूखंडाचे भाव गगनाला भिडले आहेत. अचानक दुप्पटीपर्यंत भाव वाढल्याने अनेक जण चक्रावले. ही फुगीर वाढ असूनही आणि आपली फसवणूक होईल, हे माहिती असूनही अनेकांनी त्यातही खरेदी केली. त्यामध्ये फसवणुकीच्याही घटना घडल्या आहेत.

एक फ्लॅट, प्लॉट किंवा भूखंड अनेकांना विक्री केल्याचे तसेच शासनाची कोणतीही परवानगी न घेता प्लॉट विक्री केल्याची प्रकरणे उघडकीस आली. त्यामुळे जिल्हा प्रशासनाला लक्ष घालून चौकशीचे आदेश द्यावे लागले होते. त्यानुसार शिवाजीनगर, इतवारा आणि इतर पोलिस ठाण्यात गुन्हेही दाखल करण्यात आले होते. तरीदेखील अजूनही फसवणुकीचे आणि जमीन हडप करण्याचे प्रकार सुरूच आहेत. मालमत्ताधारकांनी देखील आपली फसवणूक होऊ नये, यासाठी सतर्क राहण्याची गरज आहे.

nanded
Nanded News : ‘आयुष्मान’ने सावरले संसार ; जनआरोग्य योजनेतून ८९ हजार रुग्णांवर मोफत उपचार

संबंधित विभागांनी लक्ष देण्याची गरज

बनावट आणि खोटे दस्ताऐवज तयार करून फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे फसवणुकीचे प्रकार घडू नयेत म्हणून जिल्हा प्रशासनासह महापालिका, नगररचना, भूसंपादन आणि रजिस्ट्री कार्यालयाने लक्ष देण्याची गरज आहे. या संबंधित कार्यालयामध्येही समन्वय नसल्याने अनेक अडचणी येत असल्याचे काही जणांचे म्हणणे आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने समन्वय साधण्याची गरज व्यक्त होत आहे.

जमीन हडपल्याने ११ जणांवर गुन्हा

मृत्यूपूर्वी वसीयतनामा करून तिघांच्या नावे जागेची वाटणी करून देण्यात आली होती. परंतू त्यांच्याच मदतीने पीआर कार्डच्या आधारे दुसऱ्या ठिकाणी असलेला प्लॉट हडपण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणात शाहबाज खान यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भाग्यनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शाहबाज खान यांनी रजिस्ट्री कार्यालयात जाऊन चौकशी केली असता त्यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यावरून ११ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

nanded
Nanded : लाेकसभेच्या पार्श्वभूमीवर नाराज पदाधिकाऱ्यांना ‘अच्छे दिन’ ; बैठका, मेळाव्याच्या माध्यमातून पक्षांकडून वातावरण निर्मिती

तक्रार नोंदविण्याचे आवाहन

फसवणूक झाली असेल किंवा बळजबरीने जागेवर कुणी कब्जा करण्याचा प्रयत्न करत असेल तर संबंधितांनी पोलिस ठाण्यात किंवा जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात तक्रार दाखल करावी, असे आवाहन पोलिस प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com