उपोषणकर्त्यांची पोलिसांना मारहाण; उमरी येथील घटना

उमरी तहसील कार्यालयासमोर सुनिल पंढरीनाथ पबीतवार हा आपल्या कुटुंबासह आपल्या विविध मागण्यासाठी अमरण उपोषणकरिता ता. २१ जून रोजी बसला होता.
उमरी पोलिसाला मारहाण
उमरी पोलिसाला मारहाण

नांदेड : उमरी येथील तहसील कार्यालयासमोर उपोषण करणाऱ्या उपोषणार्थ्यानेच बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनाच मारहाण करुन शासकीय कामात अडथळा निर्माण केला. हा धक्कादायक प्रकार ता. 22 जून रोजी दुपारी दोनच्या सुमारास उमरी तहसील कार्यालय परिसरात घडला.

याबाबत अधिक माहिती अशी की उमरी तहसील कार्यालयासमोर सुनिल पंढरीनाथ पबीतवार हा आपल्या कुटुंबासह आपल्या विविध मागण्यासाठी अमरण उपोषणकरिता ता. २१ जून रोजी बसला होता. त्यामुळे उपोषणस्थळी बंदोबस्तासाठी पोलिस अंमलदार माधव प्रकाश पवार व त्यांचे सहकारी त्यांच्या संरक्षणार्थ थांबले होते. यावेळी उपोषणकर्त्यांनी उपोषणाची जागा सोडून रेल्वे पटरीवर जाऊन आत्महत्या करतो असे सांगून जात होता. आत्महत्येपासून त्याला परावृत्त करण्यासाठी बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी विरोध केला. यावेळी संतप्त झालेल्या उपोषणकर्त्यांने पोलीस कर्मचाऱ्यांनाच शिविगाळ करुन धक्काबुक्की केली. एवढेच नाही तर शासकिय कामात अडथळा निर्माण केला.

हेही वाचा - यॉर्कर स्पेशलिस्ट बुमराहला न्यूझीलंडच्या पहिल्या डावात एकही विकेट मिळाली नाही.

पोलिस अमलदार माधव पवार व त्यांच्या सहकाऱ्याने सुनिल पबितवार यास ताब्यात घेतले. त्यानंतर उमरी पोलिस ठाण्यात हजर केले. माधव पवार यांच्या फिर्यादीवरुन उमरी पोलिस ठाण्यात उपोषणकर्त्याविरुद्ध शासकीय कामात अडथळा निर्माण करणे, धक्काबुक्की करणे, शिवीगाळ करणे यासह आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास उपनिरीक्षक श्री अटकोरे करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com