esakal | दिवाळीनंतर डाळींचा तुटवडा निर्माण होण्याची भिती
sakal

बोलून बातमी शोधा

File photo

यंदा तूर, हरबरा आदींची पीके चांगले बहरलेले होते. त्यामुळे उत्पादन मोठ्याप्रमाणावर होण्याची आशा होती. परंतु, अतिवृष्टीमुळे त्यावर पाणी फेरले आहे.

दिवाळीनंतर डाळींचा तुटवडा निर्माण होण्याची भिती

sakal_logo
By
प्रमोद चौधरी

नांदेड : यंदा खरीप अर्थात पावसाळ्यातील पेरण्या जवळपास मागीलवर्षी इतक्याच आहेत. त्या तुलनेत मागणी मात्र वाढण्याची स्थिती आहे. यामुळे दिवाळीनंतर बाजारात येणाऱ्या नवीन डाळींचा यंदा तुटवडा भासण्याची शक्यता व्यापाऱ्यांमधून वर्तविली जात आहे.

महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक डाळ उत्पादनांपकी एक राज्य आहे. त्यातही तूर लागवडीत महाराष्ट्र हा देशाक अग्रेसर असतो. यामुळेच देशाला डाळींचा पुरवठा करणारी मुख्य बाजारपेठ ही अकोला, नागपूर व मुंबईत आहे. यंदा मात्र जेमतेम लागवडीमुळे तुटवड्याची शक्यता व्यक्त होत आहे. 

हेही वाचा - नांदेड : परतीच्या पावसामुळे रानमेवा असलेले सिताफळ बेचव

केंद्रीय कृषी मंत्रालयांतर्गत विविध संस्थांच्या अहवालानुसार मागीलवर्षीपेक्षा ५५ हजार हेक्टर क्षेत्रावर अतिरिक्त पेरणी झाली आहे. पण डाळींची मागणी सातत्याने वाढली आहे. त्यातुलनेत ही वाढ फार नाही, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. तूर डाळीचा विचार केल्यास महाराष्ट्रातील तुरीची उत्पादकता साधारण ७०० किलो प्रति हेक्टर आहे. त्यानुसार यंदा राज्यातून ८.९४ लाख टनच उत्पादनाची चिन्हे आहेत. काही प्रमाणात मध्य प्रदेशातही तूर डाळीचे उत्पादन घेतले जाते, असे डाळींचे घाऊक व्यापारी प्रल्हाद शिदलंबे यांनी स्पष्ट केले आहे.

हे देखील वाचा - नांदेड - खादीवर घोषणांचा पाऊस, सरकार कडून प्रत्यक्षात मदत नाही - ईश्र्वरराव भोसीकर यांची खंत

तांदळाच्या पेरणीतही यंदा ४१ हजार हेक्टरची वाढ झाली आहे. परंतु, यंदा कोरोना संकटामुळे अनेकजण वर्क फ्राॅम होम करीत आहेत. यामुळे घराघरातून तांदळाची मागणी वाढली आहे. त्यामुळेच ४१ हजार हेक्टरची वाढ ही तशी खूपच कमी आहे. नवीन तांदूळ हा साधारण नोव्हेंबर ते जानेवारीदरम्यान बाजारात येत असते. दरम्यान तांदळाचे दर वधारण्याची शक्यता आहे. राज्यातील तांदळाची उत्पादकता साधारण २.१५ टन प्रति हेक्टर आहे. त्याचा विचार केल्यास राज्यात यंदा तांदळाचे जेमतेम ३० ते ३५ लाख टन उत्पादन होण्याची शक्यताही श्री. शिदलंबे यांनी व्यक्त केली आहे.

येथेही क्लिक कराच - दुर्दैवी घटना : सख्ख्या दोन चुलत भावांचा डोहात बुडून मृत्यू

यावर्षी वेळेवर पाऊस झाल्याने तूर, हरबरा, मूगाचे पीक चांगले आले होते. यंदा उत्पादन चांगले होणार असल्याने शेतकऱ्यांच्याही आशा पल्लवीत झाल्या होत्या. परंतु, हातातोंडाशी आलेली ही पीके शेतकऱ्यांच्या डोळ्यादेखत निसर्गाने हिरावून घेतले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंती अधिकच झाली आहे. विक्रीतर दूरच घरापुरती डाळ यंदा निघणे अवघड झाल्याचे शेतकरी सखाराम भुमे यांनी सांगितले.

हे तर वाचलेच पाहिजे - नांदेडमधील उड्डाणपुलाचे काम ‘एमएसआरडीसी’च्या बजेटमधून होणार

यंदा तूर, हरबरा आदींची पीके चांगले बहरलेले होते. त्यामुळे उत्पादन मोठ्याप्रमाणावर होण्याची आशा होती. परंतु, अतिवृष्टीमुळे त्यावर पाणी फेरले आहे. परिणामी डाळींच्या उत्पादन कमी होणार असल्याने दिवाळीनंतर तुटवडा भासण्याची शक्यता असल्याचेही व्यापारी प्रल्हाद शिदलंबे यांनी सांगितले.