esakal | अत्याचार करणाऱ्या नराधमास शिक्षा
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

अत्याचार करणाऱ्या युवकास येथील जिल्हा न्यायाधीश (प्रथम) एस. एस. खरात यांनी सोमवारी (ता. २२) दहा वर्ष व चार हजाराच्या दंडाची शिक्षा सुनावली.

अत्याचार करणाऱ्या नराधमास शिक्षा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नांदेड : एका तेरा वर्षीय अल्पवयीन युवतीला पळवून नेऊन तिच्यावर अत्याचार करणाऱ्या युवकास येथील जिल्हा न्यायाधीश (प्रथम) एस. एस. खरात यांनी सोमवारी (ता. २२) दहा वर्ष व चार हजाराच्या दंडाची शिक्षा सुनावली.  

शहराच्या वाघाळा परिसरात राहणाऱ्या एका अल्पवयीन युवतीस फुस लावून पळवून नेऊन तिच्यावर अत्याचार केला. त्याला त्याची एक नातेवाईक आणि मित्र यांनी सहकार्य केले. पिडीत युवतीचे आईवडील सायंकाळी कामावरुन घरी आल्यानंतर आपली मुलगी घरी दिसुली नाही. तिला कोणीतरी अज्ञात कारणावरून पळवून नेल्याची तक्रार ता. १७ डिसेंबर २०१७ रोजी नांदेड ग्रामिण पोलिस ठाण्यात दिली. यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पिडीत मुलीचा शओध सुरू केलेला असता ती व आरोपी पूणे येथे असल्याचे समजले. यावरून महिला फौजदार स्वाती कावळे व त्यांचे सहकारी यांनी पूणे येथून पिडीत मुलगी व आरोपीला ताब्यात घेतले. 

हेही वाचागोदावरीचे पावित्र्य राखा, अन्यथा गय नाही...असा इशारा कोणी दिला? वाचा...

नांदेड ग्रामिण पोलिस ठाण्यात होता गुन्हा दाखल 

नांदेडला आणल्यानंतर पिडीत मुलीच्या तक्रारीवरुन आरोपी सुनिल वसंतराव शिंदे रा. टाकळी (ता. नायगाव) आणि त्याची एक नातेवाईक महिला व मित्र संतोष जीर्गे यांच्यावर अत्याचार, अपहरण यासह आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. 

दोघांची निर्दोष सुटका

मुलीची वैद्यकीय तपासणी झाली. त्यावेळेस ती एक महिन्याची गरोदर होती. तिने आपल्या सोबत घडलेली घटना सांगीतली. आरोपी महिलेच्या घरी ती पाणी पिण्यासाठी जायची. सुनीलने त्याचा फायदा घेतला आणि घरी तिच्या सोबत अत्याचार केला. त्यानंतर संतोषच्या शेतात एक दिवस राहुन त्यांने डबा दिला व नंतर पुण्यात घेऊन आरोपी राहु लागले. असे पिडीत मुलीने आपल्या जबाबात पोलिसांना सांगितले. 

येथे क्लिक कराडॉ. शंकरराव चव्हाण जलभूषण पुरस्काराचे १४ जुलै रोजी वितरण

जिल्हा न्यायाधीस एस. एस. खरात यांचा निकाल

पोलिसांनी सर्व बाजूने तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. पिडीतेचा वैद्यकीय अहवाल व १९ साक्षिदारांचे जबाब यावरून आरोपी सुनिल शिंदे याला दहा वर्ष व रोख चार हजाराच्या दंडाची शिक्षा सुनावली. मात्र पुराव्याअभावी दोघांना निर्दोष सोडण्यात आले. सरकार पक्षाची बाजू ॲड. बतुला मनिकुमारी (डांगे) यांनी पाहिली.