नांदेड : वीज कोसळून तिघेजण ठार; एक जखमी

लोहा, हिमायनगर तालुक्यातील घटना, तिघे गंभीर जखमी
rain update Nanded Three killed lightning one injured
rain update Nanded Three killed lightning one injuredSakal

लोहा, हिमायतनगर : वीज कोसळून लोहा तालुक्यात तीन तर हिमायतनगर तालुक्यात एकाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (ता. १८) घडली. तीन जण गंभीर जखमी झाले असून तिघे बालंबाल बचावले.पानशेवडी (ता. लोहा) येथील ऊसतोड मजूर पोटाची खळगी भरण्यासाठी हाती कोयता घेऊन सकाळी धावरी शिवारात आले. शेतकरी सुधाकर किशन पवार यांच्या शेतात ऊस तोडणी सुरू असताना दुपारी तीनच्या दरम्यान विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस सुरू झाला. त्यामुळे मजर झाडाच्या आश्रयाला गेले.

तेथे वीज पडून माधव पिराजी डुबुकवाड (वय ४५, रा. पानभोशी, ता. कंधार), पोचिराम शामराव गायकवाड (४५), रूपाली पोचिराम गायकवाड (१६, दोघे पेठ पिंपळगाव) यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेत पूजा माधव गायकवाड ( १४) ही जखमी झाली असून शासकीय रुग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती लोह्याचे पोलिस निरीक्षक तांबे यांनी दिली. निरीक्षक तांबे, सचिन गिरे, हेड कॉन्स्टेबल कृष्णा सूर्यवंशी, सरपंच माणिकराव वाकडे, पोलिस पाटील वैजनाथ पांचाळ आदींनी पंचनामा केला.

मळणी यंत्रावर पडली वीज

हिमायतनगर तालुक्यातील सिबदरा शिवारातील वीज पडून मजुराचा मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी झाले. या घटनेतून तिघे बालंबाल बचावले. सोयाबीन काढणीसाठी वारंगटाकळी येथील मळणी यंत्र घेऊन सहा मजूर सिबदरा शिवारात आले होते. काम संपल्यानंतर ते दुपारी गावाकडे परतण्याच्या तयारीत होते. त्यावेळी अचानक पाऊस सुरू झाला. त्यामुळे तीन मजुर मळणी यंत्राखाली आडोशाला बसले तर तिघेजण ताडपत्री पांघरूण बाजुला बसले होते. मळणी यंत्रावर वीज पडल्याने बसलेल्या तिघांपैकी सुनिल साहेबराव वायकोळे (वय ३५, रा. वारंगटाकळी) यांचा जागीच मृत्यू झाला. सोबत असलेले गजानन शंकर तोकलवाड, साहेबराव आबाराव तोकलवाड गंभीर जखमी झाले. आहेत. गोविंद कदम, उमाराव हाके, गजानन करे (रा. वारंगटाकळी) हे बालंबाल बचावले. सुनिल साहेबराव वायकोळे यांच्या मागे आई, पत्नी, तीन मुली असा परिवार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com