esakal | कोरोना विरहीत आरोग्याची गुढी उभारा- निखील लातूरकर 
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

यावर्षीही कोरोनाची दुसरी लाट मोठ्या प्रमाणात वाढल्याने सर्व हिंदू धर्मियांनी आपल्या घरीच कोरोनाविरहीत आरोग्याची गुढी उभारा असे आवाहन निखील लातूरकर यांनी केली आहे.

कोरोना विरहीत आरोग्याची गुढी उभारा- निखील लातूरकर 

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : दरवर्षी हिन्दु नवीन वर्ष पाडव्यानिमित्त निखील लातुरकर यांच्या वतीने मोठ्या प्रमाणावर नांदेड शहरात शोभायात्रा काढण्यात येते. गतवर्षीपासून कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झाल्यामुळे शोभायात्रा रद्द करण्यात आली होती. यावर्षीही कोरोनाची दुसरी लाट मोठ्या प्रमाणात वाढल्याने सर्व हिंदू धर्मियांनी आपल्या घरीच कोरोनाविरहीत आरोग्याची गुढी उभारा असे आवाहन निखील लातूरकर यांनी केली आहे.

यावर्षी पण गुडीपाढव्याला अतिशय मोठ्या प्रमाणावर शोभा यात्रा काढण्याचे नियोजन होते. परंतु सध्या कोरोना विषाणूचा मोठ्या प्रमाणात उद्रेक झाल्याने नांदेड शहर व जिल्ह्यात दररोज रुग्ण वाढत आहेत. तसेच कोरोनामुळे मृत्यूंची संख्या कमालीने वाढली आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यामुळे रुग्णांना बेड, ऑक्सीजन, रेमीडिसीवर हे पण उपलब्ध होत नाहीत. अश्या भिषण परिस्थितीत जनतेला त्रास होवु नये. मोठ्या प्रमाणावर हिन्दुत्ववादी व हिन्दु प्रेमी जनता एकत्र आल्यास कोरोनाचा प्रादुर्भाव वाढु शकतो. त्यामुळे सामाजिक हित लक्षात घेवून व पोलिस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांचे सोबत चर्चा केली. यावेळी पोलिस अधिक्षक श्री. शेवाळे यांनी सामाजिक सलोखा व समाजाचे हित बघुन तसेच कोरोना प्रादुर्भावामुळे जनतेला त्रास होवु नये. अशी सकारात्मक चर्चा झाली व यावेळी हिन्दु नवीन वर्षाची शोभा यात्रा रद्द करण्याच्या निर्णय घेण्यात आला. यावेळी पोलिस निरीक्षक प्रशांत देशपांडे,स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांची उपस्थिती होती.

हेही वाचा - आंबेडकरवादी समाजाने अभ्यास उपक्रमाने घराघरात जयंती साजरी करावी- दीपक कदम

हजारोंच्या संख्येने येणाऱ्या हिन्दुत्वादी प्रेमी जनतेने आप- आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी. घराबाहेर पडु नये, आप- आपल्या घरीच हिन्दु नवीन वर्ष म्हणजे गुढीपाढवा साजरा करावा. यावर्षी आपले आरोग्य सांभाळुन कोरोना विरहीत आरोग्याची गुढी उभारावी, असे संयोजक व अखिल भारतीय ब्राम्हण महासंघ महाराष्ट्र कार्यकारी अध्यक्ष निखील लातुरकर यांनी आवाहन केले आहे.

loading image