राष्ट्रसंत डॉ.शिवलींग शिवाचार्य महाराज यांच्या प्रकृतीची विचारपुस- कोणी केली ते वाचा ?

प्रल्हाद कांबळे
Monday, 31 August 2020

खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी येथील एका खासगी रुग्णालयात जाऊन रविवारी केली.

नांदेड - राष्ट्रसंत शिवलींग शिवाचार्य महाराज अहमदपुरकर यांच्या  प्रकृतीची विचारपुस नांदेडचे खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी येथील एका खासगी रुग्णालयात जाऊन रविवारी केली.यावेळी खा.चिखलीकर यांनी महाराजचे दर्शन घेतले.महाराजांच्या दर्शनाने धन्य झालो महाराजांची प्रकृती ठणठणीत असल्याची माहीती दिली.

लिंगायत समाजाचे आराध्य दैवत असलेले राष्ट्रसंत डॉ.शिवलींग शिवाचार्य महाराज अहमदपुरकर हे जिवंत समाधी घेणार असल्याची आफवा दोन दिवसापुवी पसरवण्यात आली होती. त्यामुळे अहमदपुर येथे महाराजांच्या अनुयायांनी भक्तीस्थळ अहमदपूर येथे मोठी गर्दी केली होती. डॉ.शिवलींग शिवाचार्य महाराज यांनी अन्नत्याग केल्याने त्यांची प्रकृती काही प्रमाणात खालवल्यानंतर डॉ. शिवलींग शिवाचार्य महाराज यांना त्यांच्या भक्तांनी नांदेड येथे उपचारासाठी आणले होते.

हेही वाचा  सोशल डिस्टन्सिंगचा बोजवारा- महापालिकचे पथक कुठे आहे ? -

डॉक्टरांनी महाराजाची प्रकृती ठणठणीत असल्याचे जाहिर

नांदेडमधील एका खासगी पॅथलॉजी मध्ये त्यांच्या पुर्ण तपासण्या केल्यानंतर महाराजांना शहरातील प्रसिध्द र्‍हदयरोग तज्ञ यांच्या रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले. डॉक्टरांनी महाराजाची प्रकृती ठणठणीत असल्याचे जाहिर करत केवळ अन्न न सेवण केल्यामुळे अस्वस्थपणा असल्याचे सांगतीले होते. डॉ.शिवलींंग शिवाचार्य महाराज अहमदपुरकर हे नांदेड येथील एका खासगी दवाखान्यात उपचार घेत असल्याची माहिती नांदेडचे खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांना मिळाल्यानंतर त्यांनी रविवारी दि.30 ऑगस्ट रोजी शहरातील डॉ.काब्दे यांच्या रुग्णालयात धाव घेतली व डॉ. शिवलींग शिवाचार्य महाराज यांच्या प्रकृतीची विचारपुस केली.यावेळी त्यांच्या समवेत पत्रकार प्रल्हाद उमाटे,नगरसेवक दत्ता वाले, बालाजी तमकुटे, विरभद्र राजुरे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. महाराजाच्या दर्शनाने धन्य झाल्याचे खा. चिखलीकर यांनी यावेळी सांगीतले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rashtrasant Dr. Shivling Shivacharya Maharaj's health was questioned who did it nanded news