विक्रमी मतदानाने टिकटिक होतंय डोक्यात, धडधड होतंय ह्रदयात अर्धापूरातील वास्तव

file photo
file photo

अर्धापूर ( जिल्हा नांदेड ) : ग्रामीण भागाच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावना-या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी (ता. 15) विक्रमी 84 टक्के मतदान झाल्याने गावपातळीवर नेत्याचे टेन्शन वाढले आहे. पॅनलप्रमुखांची धाकधूक वाढली आहे. टिकटिक होतंय डोक्यात, धडधड होतय ह्रदयातअशी अवस्था निर्माण झाली असून ही धडधड सोमवारी (ता. 18) मतमोजणी झाल्यावरच थांबणार आहे. आपल्या पॅनलच्या विजयाबद्दल पैजा लागत आहेत.

तालुक्यातील 43 ग्रामपंचायतीची निवडणुक प्रक्रियेत सहा बिनविरोध निवडणूका झाल्यानंतर उरलेल्या 37 ग्रामपंचायतीसाठी शुक्रवारी मतदान घेण्यात आले. तालुक्यातील 65 हजार मतदारांसाठी 130 मतदान केंद्रे तयार करण्यात आली होती. या मतदान केंद्रावर मतदारांनी मतदानाचा हक्क बजावत आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पडले. यात महिला मतदार 25 हजार 741 तर 28 हजार 761 पुरुष मतदार आहेत. मतदानाची टक्केवारी 83. 90  इतकी आहे.

या निवडणुकीत पक्षाच्या चिन्हांचा वापर नसल्यामुळे स्थानिक राजकीय समिकरणे, गट यानूसार पॅनल झाले. काही अपवाद वगळता प्रत्येक पॅनलमध्ये सर्वच पक्षाचे स्थानिक नेते एकत्र लढले आहेत. काही गावात शिवसेना, काॅग्रेस, भाजपा आसे पॅनल होते तर कुठे  भाजपा सेना, तर कुठे भाजपा काॅग्रेस, असे वेगवेगळ्या विचाराचे स्थानिक नेते एकत्र येऊन निवडणूक लढले. तर काही गावात पक्षाच्या नावावर पॅनल केले. काॅग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी दोन स्वतंत्र पॅनल करून निवडणूक लढवली. हे दोन्ही गट पालकमंत्री अशोक चव्हाण यांना मानणारे आहेत.

मतदान आपल्याला जास्ती जास्त करण्यासाठी मतदारांना लक्ष्मी दर्शन केल्याची जोरदार चर्चा गावा गावात रंगत आहेत. तालुक्यात निवडणूकीच्या निमित्ताने कोट्यवधी रुपांची उधळपट्टी झाली असून आता निकालाची प्रतिक्षा आहे. यंदा विक्रमी मतदान झाल्याने गावपातळीवर नेत्यांचे टेन्शन वाढले आहे. मतदारांनी यंदाच्या निवडणुकीत कोणाला मतदानाचे तिळगूळ दिले आहे व कोणावर संक्रांत आली आहे, मतमोजणी झाल्यावर स्पष्ट होईल. 

संपादन- प्रल्हाद कांबळे
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com