शौचालयाचा नियमित वापर आवश्‍यकच - सीईओ वर्षा ठाकूर | Nanded | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शौचालयाचा नियमित वापर आवश्‍यकच - सीईओ वर्षा ठाकूर

शौचालयाचा नियमित वापर आवश्‍यकच - सीईओ वर्षा ठाकूर

नांदेड : शाश्‍वत स्‍वच्‍छतेसाठी शौचालयाचा वापर आवश्‍यक आहे. स्‍वच्‍छ भारत मिशनच्‍या दुसऱ्या टप्‍प्‍यात शौचालय वापरासह सांडपाणी व घनकचरा व्‍यवस्‍थापनावर भर दिला जात आहे. मोठ्या ग्रामपंचायती, बसस्‍थानक, बाजारपेठ असलेल्‍या ग्राम पंचायतीमध्‍ये सार्वजनिक शौचालयाच्‍या सुविधा दिल्‍या जात आहेत. गाव स्‍वच्‍छतेसाठी या सुविधांचा महत्‍वपूर्ण असल्‍याचे मत जिल्‍हा परिषदेच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी व्‍यक्‍त केले.

हेही वाचा: नागपूर : विरोधकांचा सवाल : सावनेर, कळमेश्वरलाच निधी का?

जागतिक शौचालय दिनानिमित्‍त जिल्‍ह्यात ता.१७ नोव्‍हेंबर पासून विविध उपक्रमाला सुरवात करण्‍यात आली. त्यानुषंगाने सीईओ ठाकूर यांनी शुक्रवारी (ता.१९) काठेवाडी (ता.देगलूर) येथे भेट देऊन सार्वजनिक शौचालयाची पाहणी करुन ग्रामस्‍थांशी संवाद साधला. याप्रसंगी जिल्‍हा परिषदेचे समाजकल्याण सभापती अॅड. रामराव नाईक, ग्राम पंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव केंद्रे, गट विकास अधिकारी राजकुमार मुक्कावार उपस्थित होते.

भेटीत सीईओ ठाकूर यांनी सरपंच सुर्यकांत पोतूलवार यांच्या राधेगोपाल अॅग्रो फर्म येथे भेट देऊन गिर गाय प्रकल्प, बायोगॅस प्लॅन्ट, मुक्त संचार गोठा, मिनी दाल मील, गांडूळखत प्रकल्प, शेणापासून बनवलेल्या पणत्या, सार्वजनिक शौचालय, ग्राम पंचायत दुरुस्‍ती, शाळेतील पाण्‍याची टाकी, सेंद्रिय शेती यासारखे विविध प्रोजेक्टची पाहाणी केली. गाव विकासासाठी सरपंच, सदस्य आणि नागरिकांनी प्रयत्न करणे आवश्‍यक असल्‍याचे मत त्‍यांनी या वेळी व्यक्त केले.

उपसरपंच लक्ष्मीबाई श्रीरंग बिरादार, तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ. आकाश देशमुख, विस्तार अधिकारी सुर्यवंशी, ग्रामसेवक शिवराज देशमुख, ग्राम पंचायत सदस्या लक्ष्मीबाई लक्ष्मणराव बिरादार, अहिल्याबाई ईश्वर बिरादार, शिवानंद सुर्यवंशी, राजू पाटील, अंतेश्वर बिरादार, सुरेश पोतूलवार, सुधाकरराव कोसंबे, माधवराव बिरादार, माजी चेअरमन संग्राम पोतूलवार, निवृत्त शिक्षक पंढरी निवळे, गोविंदराव बिरादार, विठ्ठल सुर्यवंशी, सायबू सुर्यशेखर, ओम बोधनकर यांच्यासह ग्रामस्‍थ उपस्थित होते.

loading image
go to top