प्राथमिक आरोग्य केंद्रामुळे ग्रामस्थांना दिलासा

nnd06sgp11.jpg
nnd06sgp11.jpg


बरडशेवाळा, (ता. हदगाव, जि. नांदेड) ः हदगाव तालुक्याला माजी जिल्हा परिषद अध्यक्षा शांताबाई जवळगावकर यांच्या कार्यकाळात मिळालेल्या निधीतून विकासाची कामे करण्यासाठी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी व येथील प्रतिनिधींनी पळसा जिल्हा परिषद गटात अनेक विकासकामे केली. राहिलेले काम पूर्ण करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पाठपुरावा करण्यासाठी प्रयत्न केले जात असून मतदार संघात विकासाच्या पाठपुराव्याला कमी पडणार नसल्याचे जिल्हा परिषद सदस्य साहेबराव सावतकर यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. 

नंदी महाराज तिर्थक्षेत्रासाठी २३ लाख
पळसा गटात छोटी-मोठी अठ्ठावीस गावे असून गटात तिस हजारच्या वर मतदान संख्या आहे. पळसा गटात मागील साडेतीन वर्षांच्या काळात जिल्हा परिषदेच्या माध्यमातून बरडशेवाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात ६८ लाख रुपये निधी उपलब्ध करून प्राथमिक आरोग्य केंद्र सुंदरतेने नावलौकिक झाले आहे. बरडशेवाळा गावातील पुलासाठी चार लाख रूपये, शाळा दुरुस्तीसाठी तिन लाख, दलित वस्ती रस्ता व पाणी पुरवठा पाच लाख, कवाना ते बामणी तांडा डांबरीकरण पंधरा लाख, कवाना येथे संत नंदी महाराज तिर्थक्षेत्रासाठी २३ लाख, पांगरी लिमटोक रस्ता पस्तीस लाख, पिंगळी निमटोक चाळीस लाख, बरडशेवाळा पांगरी रस्ता २५ लाख, पांगरी शाळा साडेसात लाख, चिंचगव्हान अंगणवाडी आठ लाख, कब्रस्तानात सहा लाख, केदारनाथ मंदिर आठ लाख, गारगव्हान समाज मंदिर सात लाख, स्मशानभूमी आठ लाख, खंडोबा मंदिर सभागृह सतरा लाख असे मिळाले.

कोरोना आजारामुळे अडचणी 
तसेच गारगव्हान पिंगळी रस्ता ४५ लाख, पळसा दोन वर्गखोल्या पंधरा लाख, डोंगरगाव वर्गखोली साडेसात लाख, दलित वस्ती व समाज मंदिर २७ लाख, आरोग्य उपकेंद्र ७५ लाख, उमरी पुल दहा लाख, उमरी दलित वस्ती समाज मंदिर व विविध कामासाठी विस लाख, पिंगळी दलित वस्ती पाच लाख, डोरली दलित वस्ती सि.सी.रोड पंधरा लाख, तरोडा विठ्ठलवाडी रस्ता पंधरा लाख, असे साडेतीन वर्षांच्या काळात पळसा गटात चार कोटींच्यावर निधी उपलब्ध करून काम करण्यात आले. एक वर्ष कोरोना आजारामुळे अडचणी येत आहेत. पुढील काळात राहीलेले काम पूर्ण करण्यासाठी आमदार जवळगावकर यांच्या माध्यमातून कमी पडणार नाही असे जिल्हा परिषद सदस्य साहेबराव सावतकर यांचे प्रतिनिधी संदीपराव काळबांडे यांनी सांगितले. 

राहिलेले काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न 
आमदार माधवराव पाटील जवळगावकर व पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या माध्यमातून पळसा जिल्हा परिषद गटात अनेक विकासकामे केली असून बरडशेवाळा प्राथमिक आरोग्य केंद्रासह परीसरातील राहिलेले काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. प्राथमीक आरोग्य केंद्र केदारनाथ येथे करण्यासाठी २०११च्या बृहर्त आराखड्यात समाविष्ट केले असून परीसरातील आदीवासी भागातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक केदारनाथ येथे प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी पाठपुरावा केला जात आहे. असे संदिपराव काळबांडे, जिल्हा परिषद सदस्य प्रतीनिधी यांनी सांगितले.

संपादन - स्वप्निल गायकवाड
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com