
नांदेड - नांदेड जिल्ह्यातील १६ तालुक्यांचे सरपंचपदाचे आरक्षण मंगळवारी (ता. दोन) आणि बुधवारी (ता. तीन) होणार होते. मात्र, त्यातून मुखेड, बिलोली आणि कंधार तालुक्याचे आरक्षण तूर्त स्थगित करण्यात आले असून ते नंतर होणार आहे. उर्वरित १३ तालुक्याचे आरक्षण मंगळवारी आणि बुधवारी होणार असल्याची माहिती नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिली.
नांदेड जिल्ह्यात एक हजार ३१० ग्रामपंचायती असून त्याच्या सरपंचपदाचे आरक्षण यापूर्वी ता. १९ नोव्हेंबर २०२० रोजी झाले होते. पण राज्य शासनाने ते रद्द केले होते. दरम्यान, जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या. ता. १५ जानेवारी रोजी मतदान झाले तर ता. १८ जानेवारी रोजी मतमोजणी झाली. त्यानंतर सर्वांचेच लक्ष सरपंचपदाच्या सोडतीकडे लागले होते. ही सोडत कधी होणार आणि सरपंचपदाचे आरक्षण कोणाला सुटणार? याची उत्सुकता गावकऱ्यांना लागली होती.
तीन तालुके वगळता आरक्षण होणार
नांदेड जिल्ह्यातील सरपंचपदाचे आरक्षण ता. २८ आणि ता. २९ जानेवारी रोजी होणार होते. पण काही जणांनी आक्षेप घेत औरंगाबादच्या खंडपीठात धाव घेतली होती. दरम्यान, जिल्ह्यातील आरक्षण सोडत मंगळवारी (ता. दोन) आणि बुधवारी (ता. तीन) आयोजित करण्यात आली होती. दरम्यान, सोमवारी (ता. एक) सायंकाळी आलेल्या निर्णयानुसार कंधार, बिलोली आणि मुखेड हे तीन तालुके वगळता आता उर्वरित १३ तालुक्यांचे आरक्षण होणार असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी शरद मंडलिक यांनी दिली.
हेही वाचलेच पाहिजे - नांदेड : शहरातील बासंतनगरमध्ये जुन्या वादातून एकाचा भोसकून खून
असे आहे नियोजन
नांदेड जिल्ह्यात आता सोळा पैकी १३ तालुक्यातील ग्रामपंचायतीचे सरपंचपदाचे आरक्षण सोडत काढण्या नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार तहसील कार्यालयात आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी (ता. दोन) सकाळी ११ वाजता तहसील कार्यालयात नांदेड, भोकर, किनवट, धर्माबाद, देगलूर व हिमायतनगर या सहा तालुक्यांचे तर बुधवारी (ता. तीन) हदगाव, अर्धापूर, मुदखेड, माहूर, उमरी, नायगाव आणि लोहा या सात तालुक्याचे सरपंचपदाचे आरक्षण जाहीर होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू
नांदेड जिल्ह्यात ता. दोन फेब्रुवारी रोजी सकाळी सहा वाजल्यापासून ते ता. १६ फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी मुंबई पोलीस अधिनियम अन्वये जिल्ह्यात मंगळवारी (ता. दोन फेब्रुवारी) सकाळी सहा वाजल्यापासून ते मंगळवार (ता. १६ फेब्रुवारी) मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहील. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश कामावरील पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही. अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.