उच्च शिक्षणातून जबाबदार नागरिक घडावेत : डॉ. सुखदेव थोरात 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 जून 2020

पीपल्स कॉलेजच्या वर्धापनदिनानिमित्त दोन दिवसीय  इ-राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. डी. एन. मोरे यांनी या परिषदेचे आयोजन केले होते.  

नांदेड : कोरोनानंतरच्या काळात निर्माण झालेल्या सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी उच्च शिक्षणातून जबाबदार नागरिक घडविण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी  विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणात गुणवत्तापूर्ण व समान संधी मिळावी. असे झाले तरच सामाजिक व आर्थिकदृष्टया दुर्बलांचे शैक्षणिक सबलीकरण होईल असे मत शिक्षणतज्ज्ञ डॉ. सुखदेव थोरात यांनी व्यक्त केले. 

दुर्बल घटक उच्च शिक्षणापासून वंचित
भारतीय सामाजिक विज्ञान संशोधन परिषदेचे माजी अध्यक्ष  डॉ. सुखदेव थोरात यांनी सांगितले की, उच्च शिक्षणातून विषमता निर्माण झाली असून नवीन तंत्रज्ञानाने ही दरी वाढवल्याचे चित्र बघायला मिळत आहे.  त्यामुळे सामाजिक व आर्थिकदृष्टया दुर्बल घटक उच्च शिक्षणापासून वंचित राहिले आहेत. 

हेही वाचा - कोरोना नियंत्रणासाठी पोलिसांचे योगदान- अशोक चव्हाण
 

शिक्षणातील बदल हाच शाश्‍वत विकास
पीपल्स महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. व्ही.एन. इंगोले म्हणाले की,  बदल ही काळाची गरज आहे. उच्च शिक्षणातील आपले स्थान, ध्येय व ते ध्येय साध्य करण्यासाठी व्यूहरचनेची गरज आहे. सर्व समावेशक विकासासाठी आर्थिक बदल हे साधन असून सामाजिक बदल हे उद्दिष्ट आहे. शिक्षणातून होणार बदल हाच शाश्वत  असतो. 

हे देखील वाचा - सोयाबीन शेतीचे तात्काळ पंचनामे करा- आ. कल्याणकर

अध्ययन पद्धतीत बदल व्हावा
तिसऱ्या सत्रात जादवपूर विद्यापीठ, कोलकत्ता येथील प्रो.डॉ. केसब भट्टाचार्य यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, कोरोनोत्तर काळात शिक्षण क्षेत्रासह प्रत्येक क्षेत्रावर आघात झाला आहे. त्यामुळे अध्ययन, अध्यापन व मूल्यमापन पद्धतीत बदल करणे गरजेचे आहे. देशाचे नवीन शैक्षणिक धोरण हे शिक्षणाचे व्यापारीकरण करणारे आहे.

येथे क्लिक कराच -  धक्कादायक..! आमदाराच्या कुटुंबातील ९ जण पॉझिटिव्ह

प्राध्यापक व पालकांचा सक्रिय सहभाग असावा
समारोप सत्रात नांदेड विभागाच्या उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. नलिनी टेम्भेकर म्हणाल्या की, कोरोना नंतरच्या काळात देशाच्या आर्थिक विकासावर परिणाम झाला असला तरीही उच्च शिक्षणापासून कोणीही वंचित राहणार नाही, यासाठी शासन-प्रशासन प्रयत्नशील आहे. उच्च शिक्षणाची गुणवत्ता टिकवण्यासाठी व त्याच्या सार्वत्रिकीकरणासाठी प्राध्यापक, संशोधक व पालकांनी सक्रिय सहभाग घेतला पाहिजे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Responsible Citizens Should Be Created Through Higher Education Nanded News